mr_tw/bible/other/tradition.md

3.9 KiB

परंपरा (संप्रदाय), परंपरेत (संप्रदायास)

व्याख्या:

"परंपरा" या शब्दाचा अर्थ रूढी किंवा सराव असे आहे, जो वेळोवेळी ठेवण्यात आला आहे, आणि जी नंतरची पिढी असलेल्या लोकांना पुढे दिली जाते.

  • पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याचदा, "परंपरा" या शब्दाचा संदर्भ लोकांनी बनवलेल्या शिकवणी आणि पद्धतींशी आहे, देवाचे नियम नव्हे. "मनुष्यांची परंपरा" किंवा "मानवी परंपरा" या अभिव्याक्तींनी हे स्पष्ट केले आहे.
  • "नेत्यांच्या परंपरा" किंवा "माझ्या पूर्वजांच्या परंपरा" यासारख्या वाक्यांशांचा संदर्भ विशेषतः यहूदी रीतिरिवाज व प्रथांशी होतो, ज्यात यहूदी पुढाऱ्यांनी काळाच्या ओघात इस्राएली लोकांना मोशेद्वारे दिलेल्या नियमांमध्ये जोडले. जरी या जोडलेल्या परंपरा देवाकडून आल्या नसल्या, तरी लोक विचार करतात की त्यांनी धार्मिक बनून राहण्यासाठी त्यांचे सुद्धा पालन केले पाहिजे.
  • प्रेषित पौलाने "परंपरा" हा शब्द वेगळ्या पद्धतीने, ख्रिस्ती रीतींच्या शिकवणीना संदर्भित करण्यासाठी वापरला, जी देवाकडून येते, आणि जी त्याने आणि इतर प्रेषितांनी विश्वासणाऱ्यांना शिकवले.
  • आधुनिक काळात, तेथे पवित्र शास्त्रामध्ये शिकविले नसलेल्या अनेक ख्रिस्ती परंपरा आहेत, परंतु हे ऐतिहासिकदृष्ट्या स्वीकारलेल्या रीतिरिवाजांचा आणि कार्याचा परिणाम आहे. पवित्र शास्त्रामध्ये देव आपल्याला जे काही शिकवतो, त्या प्रकाशात या परंपरांचे नेहमीच मूल्यांकन करणे आवश्यक आहे.

(हे सुद्धा पहा: प्रेषित, विश्वास, ख्रिस्ती, पूर्वज, पिढी, यहुदी, नियम, मोशे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: