mr_tw/bible/other/teacher.md

4.6 KiB
Raw Permalink Blame History

शिक्षक, गुरुजी

व्याख्या:

शिक्षक म्हणजे अशी व्यक्ती आहे, जो इतर लोकांना नवीन माहिती देतो. शिक्षक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी इतरांना मदत करतात.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "शिक्षक" हा शब्द एखाद्या विशिष्ट अर्थाने वापरला जातो, ज्याचा संदर्भ देवाबद्दल शिकवणाऱ्या व्यक्तीशी येतो.
  • जे लोक शिक्षकांपासून शिकतात त्यांना "विद्यार्थी" किंवा "शिष्य" म्हणतात.
  • काही बायबल भाषांतरांमध्ये, हा शब्द मोठ्या अक्षरामध्ये लिहून, येशूसाठी शीर्षक म्हणून वापरला जातो.

भाषांतर सूचना

  • जोपर्यंत तो शब्द फक्त शालेय शिक्षकांसाठी येत नाही, तोपर्यंत शिक्षकांसाठी असणारा सामान्य शब्द या शब्दाचे भाषांतर करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
  • काही संस्कृतीमध्ये धार्मिक शिक्षकांसाठी एक विशिष्ठ शीर्षक असू शकते, जसे की, "सर" किंवा "गुरुजी" किंवा "उपदेशक."

(हे सुद्धा पहा: शिष्य, उपदेश)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 27:01 एके दिवशी, यहूदी धर्मशास्त्रात पारंगत असलेला एक व्यक्ती येशूची परिक्षा पाहण्यासाठी येऊन म्हणाला,गुरुजी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय करावे?

  • 28:01 एके दिवशी, एक श्रीमंत तरुण अधिकारी येशूकडे येऊन विचारु लागला,‘‘उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे?

  • 37:02 दोन दिवसानंतर, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला,‘‘आपण पुन्हा यहूदीयामध्ये जाऊ’’. ‘‘परंतू गुरुजी शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘थोडया वेळापूर्वीच तेथील लोक आपणास मारावयास टपले होते!

  • 38:14 यहूदा येशूजवळ येऊन म्हणाला, ‘‘सलाम, गुरुजी, आणि त्याने त्याचे चुंबन घेतले.

  • 49:03 येशू हा एक महान शिक्षक सुद्धा होता व देवाचा पुत्र असल्यामुळे अधिकारवाणीने बोलत होता.

  • Strong's: H3384, H3887, H3925, G1320, G2567, G3547, G5572