mr_tw/bible/other/splendor.md

2.6 KiB

शोभा (सौंदर्य)

व्याख्या:

"शोभा" या शब्दाचा संदर्भ अत्यंत सौंदर्य आणि सुरेखपणा ह्याच्याशी येतो, जे बऱ्याचदा संपत्ती आणि भव्य स्वरूपाशी संबंधित आहे.

  • बऱ्याचदा शोभा या शब्दाचा उपयोग एखाद्या राजाकडे असणाऱ्या संपत्तीचे वर्णन करण्यासाठी किंवा तो त्याच्या किमती सुंदर पोषाखामध्ये कसा दिसतो, ह्याच्यासाठी केला जातो.
  • "शोभा" या शब्दाचा उपयोग देवाने निर्माण केलेल्या झाडांच्या, टेकड्यांच्या आणि इतर गोष्टींच्या सुंदरतेचे वर्णन करण्यासाठी सुद्धा केला जातो.
  • काही शहरांना शोभा आहे असे म्हंटले जाते, त्याचे कारण त्यांचे नैसर्गिक स्त्रोत, विस्तृत इमारती आणि रस्ते, आणि तेथील लोकांची संपत्ती, ज्यामध्ये उंची पोशाख, सोने आणि चांदीचा समावेश होतो, हे आहे.
  • संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर, "भव्य सौंदर्य" किंवा "आश्चर्यकारक वैभव" किंवा "शाही महानता" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: गौरव, राजा, वैभव)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: