mr_tw/bible/other/spear.md

2.8 KiB

भाला, भाले, भालेकरी

व्याख्या:

एक भाला हे एक लांब लाकडी दांडा असलेले आणि त्याच्या दुसऱ्या बाजूस तीक्ष्ण धातूचे पाते असलेले लांब फेकण्याचे शस्त्र आहे.

  • पवित्र शास्त्राच्या काळात, भाले हे युद्धामध्ये लढण्याचे सामान्य हत्यार होते. सध्याचा काळात सुद्धा काहीवेळा त्यांचा उपयोग, विशिष्ठ लोकांच्या समूहातील भांडणात केला जातो.
  • जेंव्हा येशूला वधस्तंभावर खिळले होते, तेंव्हा एका रोमी शिपायाने भाल्याचा उपयोग येशूच्या बरगडीमध्ये भोसकण्यासाठी केला.
  • काहीवेळा लोक खाण्यासाठी मासे किंवा इतर भक्ष्य पकडण्यासाठी भाले फेकतात.
  • "बरछी" आणि "सोटा" ही त्याच्यासारखी शस्त्रे आहेत.
  • "भाला" या शब्दाचे भाषांतर "तलवार," ज्याचा अर्थ असे शस्त्र ज्याचा उपयोग खुपसण्यासाठी किंवा भोसकण्यासाठी करतात, फेकण्यासाठी नाही, या शब्दापेक्षा वेगळे केले जाईल ह्याची खात्री करा. त्याचबरोबर, तलवारीला लांब पात्याबरोबर एक मुठ असते, तर भाल्याला लांब दांड्याच्या टोकाला एक छोटे पाते असते.

(हे सुद्धा पहा: भक्ष्य, रोम, तलवार, योद्धा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: