mr_tw/bible/other/sinoffering.md

2.3 KiB

पापार्पण, पापार्पणे

व्याख्या:

"पापार्पण" हे अनेक बालीदानांपैकी एक होते, जे इस्राएली लोकांनी देवाला अर्पण करणे गरजेचे होते.

  • या अर्पनामध्ये बैलाचे बलिदान करून, त्याचे रक्त आणि चरबी वेदीवर जाळण्याचा आणि राहिलेले प्राण्याचे शरीर, इस्राएलच्या तंबूच्या बाहेर नेऊन जमिनीवर जाळण्याचा समावेश होता.
  • या प्राण्याचे बलिदानाचे संपूर्ण जळणे, आपल्याला देव किती पवित्र आणि पाप किती भयंकर आहे हे दर्शवते.
  • पवित्र शास्त्र शिकवते की, पापापासून शुद्ध होण्याकरिता, जे पाप केले आहे त्याची भरपाई म्हणून रक्त ओतले गेले पाहिजे.
  • प्राण्यांच्या बलिदानाने पापाबद्दल कायमची क्षमा मिळत नव्हती.
  • येशूच्या वधस्तंभावरील मरण्याने, पापाबद्दलची कायमची भरपाई करण्यात आली. तो एक परिपूर्ण पापार्पण होता.

(हे सुद्धा पहा: वेदी, गाय, क्षमा, बलिदान, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: