mr_tw/bible/other/shame.md

8.3 KiB

लाज वाटणे, लाज्जित, अपमान, अपमान करणे, निंदा करणे

व्याख्या:

"लाज" या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादा व्यक्ती असे काही करतो ज्याला इतर लोक असन्माननीय किंवा अयोग्य मानतात तेव्हा तो व्यक्ती लज्जित किंवा अपमानित होतो.

  • काहीतरी जे "लाजिरवाणे" असते ते "अयोग्य" किंवा "असन्मानीय" आहे
  • "लज्जित" या शब्दामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती अयोग्य किंवा असन्माननीय काहीतरी करतो तेव्हा त्याला कसे वाटते याचे वर्णन केले आहे.
  • "अपमान करणे" या शब्दाचा अर्थ असा आहे की सामान्यत: सार्वजनिकरित्या एखाद्याला लज्जित किंवा अपमानित करणे. एखाद्याला लज्जास्पद करण्याच्या कृत्यास "अपमान" असे म्हणतात.
  • एखाद्याची "निंदा करणे" म्हणजे त्या व्यक्तीच्या चरित्र किंवा वर्तनावर टीका करणे किंवा त्यास नाकारणे.
  • "लज्जित करणे" या वाक्यांशाचा अर्थ म्हणजे लोकांना पराभूत करणे किंवा त्यांच्या कृती उघडकीस आणणे जेणेकरून त्यांना स्वतःची लाज वाटेल. संदेष्टा यशया म्हणाला की जे लोक मूर्ती बनवतात व त्यांची उपासना करतात ते लज्जित होतील.
  • "अपमानकारक" हा शब्द एखाद्या पापी कृत्याचे किंवा ज्याने केले त्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती पापमय गोष्टी करतो तेव्हा त्या गोष्टी त्याला अपमान किंवा असन्माननीय स्थितीत आणू शकतात.
  • कधीकधी चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे वागणूक दिली जाते ज्यामुळे त्याला अपमान किंवा लाज वाटेल. उदाहरणार्थ, जेव्हा येशू वधस्तंभावर मारला गेला, तेव्हा मरण्याचा हा मार्ग अपमानजनक होता. या अपमानास पात्र अशी काहीही चूक येशूने केली नव्हती.
  • जेव्हा देव एखाद्याला नम्र करतो, तेव्हा याचा अर्थ असा होतो की तो गर्विष्ठ व्यक्तीला त्याच्या गर्वावर विजय मिळविण्यासाठी मदत करण्यास अपयशाचा अनुभव घडवितो. एखाद्याचा अपमान करण्यापेक्षा हे वेगळे आहे, जे त्या व्यक्तीला दुखावण्यास वारंवार केले जाते.
  • एखादा व्यक्ती "निंदेच्या वर" किंवा "निंदे पलीकडे" किंवा "निंदा न करता" असे म्हणणे म्हणजे हा व्यक्ती देवाच्या मार्गाने वागतो आणि त्याच्यावर टीका करताना थोडे किंवा काहीही म्हटले जाऊ शकत नाही.

भाषांतरातील सूचना

  • "अपमान" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या मार्गांमध्ये "लाज वाटणे" किंवा "अप्रतिष्ठा" या शब्दांचा समावेश होऊ शकतो,

"अपमानकारक" भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये "अपमानकारक" किंवा “लज्जास्पद” हे शब्द समाविष्ट असू शकतात.

  • "अपमान करणे" या शब्दाचे भाषांतर "लाज वाटणे" किंवा "लाज वाटण्याचे कारण" किंवा "लाजिरवाणे" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.
  • संदर्भानुसार, "अपमान" या शब्दाला भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये "लाज वाटणे" किंवा "मानहानी" किंवा "अपमान" या शब्दांचा समावेश असु शकतो.
  • "निंदा" या शब्दाचे भाषांतर "आरोप" किंवा "लाज" किंवा "अपमान" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.
  • "निंदा करणे" या वाक्यांशाचे भाषांतर "ताडण करणे" किंवा "आरोप करणे" किंवा "टीका करणे" असे भाषांतर देखील केले जाऊ शकते, संदर्भावर अवलंबुन आहे.

(हे देखील पाहा: [अप्रतिष्ठा], [आरोप], [ताडण], [खोटे दैवत], [नम्र], [यशया], [उपासना])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 पेत्र 03: 15-17]
  • [2 राजे 02:17]
  • [2 शमुवेल 13:13]
  • [लुक 20:11]
  • [मार्क 08:38]
  • [मार्क 12: 4-5]
  • [1 तीमथ्याला पत्र 03:07]
  • [उत्पत्ति 34:07]
  • [इब्री 11:26]
  • [विलापगीत 02: 1-2]
  • [स्तोत्रसंहीता 022:06]
  • [अनुवाद 21:14]
  • [एज्रा 09:05]
  • [नीतिसूत्रे 25: 7-8]
  • [स्तोत्रसंहीता 006: 8-10]
  • [स्तोत्रसंहीता 123:03]
  • [1 तीमथ्याला पत्र 05: 7-8]
  • [1 तीमथ्याला पत्र 06: 13-14]
  • [यिर्मया 15: 15-16]
  • [ईयोब 16: 9-10]
  • [नीतिसूत्रे 18:03]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच937, एच954, एच955, एच1317, एच 1322, एच 1421, एच 1442, एच 1984, एच 2490, एच 2616, एच 2617, एच 2659, एच2778, एच 2781, एच 2865, एच3001, एच3637, एच3639, एच3640, एच3971, एच5007, एच5034, एच5039, एच6030, एच6031, एच6172, एच6256, एच7022, एच7034, एच7036, एच7043, एच7511, एच7817, एच8103, एच8213, एच8216, एच8217, एच8589, जी 149, जी 152, जी 153, जी 410, जी 422, जी 423, जी 808, जी 818, जी 819, जी 821, जी 1788, जी 1791, जी 1870, जी 2617, जी 3059, जी3679, जी 3680, जी3681, जी 3856, जी 5014, जी 5195, जी 5196, जी5484