mr_tw/bible/other/reject.md

4.3 KiB
Raw Permalink Blame History

नाकारणे, नकार केला, नकार

व्याख्या:

एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला "नाकारणे" म्हणजे त्या व्यक्तीला किंवा वस्तूला स्वीकारण्यास नकार देणे.

  • "नकार" या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीवर "विश्वास ठेवण्यास नकार देणे" असा देखील असू शकतो.
  • देवाला नाकारणे म्हणजे त्याचे पालन करण्यास नकार देणे होय.
  • जेव्हा इस्राएल लोकांनी मोशेचे पुढारीपण नाकारले तेव्हा याचा अर्थ असा की ते त्याच्या अधिकाराविरूद्ध बंड करीत होते. त्यांना त्याचे आज्ञा पालन करायचे नव्हते.
  • इस्राएल लोकांनी असे दाखवून दिले की जेव्हा ते खोट्या देवतांची उपासना करतात तेव्हा ते देवाला नाकारत होते.
  • "दुर ढकलने" ही संज्ञा या शब्दाचा शाब्दिक अर्थ आहे. इतर भाषांमध्ये समान अभिव्यक्ती असू शकते ज्याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास नापसंत करणे किंवा नकार देणे.

भाषांतरातील सूचना

  • संदर्भानुसार, "नाकारणे" या शब्दाचे भाषांतर "स्वीकारत नाही" किंवा "मदत करणे थांबविणे" किंवा "पालन करण्यास नकार देणे" किंवा "आज्ञा पाळणे थांबविणे" या वाक्यांशांद्वारे देखील केले जाऊ शकते.
  • "बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड" या अभिव्यक्तीमध्ये "नापसंत केलेला" हा शब्द "वापरण्यास नाकारलेला" किंवा "स्वीकारला नाही" किंवा "फेकून दिलेला" किंवा “निरुपयोगी म्हणून टाकलेला” असे म्हणून अनुवादित केला जाऊ शकतो.
  • संदर्भातील ज्या लोकांनी देवाच्या आज्ञांचा नकार केला, त्या संदर्भात नाकारले या शब्दाचे भाषांतर त्याच्या आज्ञा "पाळण्यास नकार दिला" किंवा "हटवादीपणाने देवाचे नियम स्वीकारण्यास निवडले नाहीत" असे म्हणून अनुवादित केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [आज्ञा देणे], [अवज्ञा करणे], [ आज्ञा पालन करणे], [ताठ मानेचे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [गलतीकरांस पत्र 04: 12-14]
  • [होशया 04: 6-7]
  • [यशया:0१:]
  • [योहान 12: 48-50]
  • [मार्क 07:09]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच947, एच959, एच2186, एच2310, एच3988, एच5006, एच5034, एच5186, एच5203, एच5307, एच5541, एच5800, जी114, जी483, जी550, जी579, जी580, जी593, जी683, जी720, जी1609, जी3868