mr_tw/bible/other/raise.md

9.3 KiB
Raw Permalink Blame History

उभारणे, उचलणे, उठविला जाणे, उभे राहणे, उभे राहिले, उठणे, उठला

व्याख्या:

उभारणे, वर उचलणे

सर्वसाधारणपणे, "उभारणे" या शब्दाचा अर्थ "उंच उचलणे" किंवा "उच्च करणे" असा होतो.

  • लाक्षणिक वाक्यांश "वर उचलणे" म्हणजे काहीतरी येणे किंवा प्रकट होण्यास कारणीभूत होणे. याचा अर्थ काहीतरी करण्यासाठी एखाद्याची नियुक्ती करणे देखील होऊ शकतो.
  • कधीकधी "वर उचलणे" याचा अर्थ "पुनर्संचयित करणे" किंवा "पुनर्बांधणी करणे" असा होऊ शकतो.
  • "उभारणे" या शब्दाचा "मृतांमधून उभारणे" या वाक्यांशासाठी एक विशेष अर्थ आहे. याचा अर्थ मृताला पुन्हा जिवंत होण्यास कारणीभूत होणे असा होऊ शकतो.
  • कधीकधी "वर उचलणे" म्हणजे एखाद्याला किंवा काहीतरी "उंच" करणे.

उभे राहणे, उठणे

"उभे राहणे" किंवा "उठणे" म्हणजे "वर जाणे" किंवा "उठणे". "उभे राहिले," "उठला," आणि "उठले" या शब्दांनी भूतकाळातील कृती व्यक्त केली.

  • जेव्हा एखादी व्यक्ती कुठेतरी जाण्यासाठी उभी राहायची, तेव्हा कधी कधी "तो उठला आणि गेला" किंवा तो उभा राहिला आणि गेला" असे शब्दप्रयोग वापरण्यात येतात.
  • काहीतरी "उठते" या शब्दाचा अर्थ "घडते" किंवा "घडण्यास सुरवात झाली" असा होऊ शकतो.
  • येशूने भाकीत केले की तो "मेलेल्यांतून उठेल." येशूच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी, देवदूत म्हणाला, "तो उठला आहे!"

भाषांतर सूचना

  • "उभारणे" किंवा "वर उचलणे" या शब्दाचे भाषांतर "वर चढवणे" किंवा "उच्च करणे" असे केले जाऊ शकते.
  • "वर उचलणे" या शब्दाचे "प्रकट होण्यास कारणीभूत होणे" किंवा "नियुक्त" किंवा "अस्तित्वात आणणे" असे भाषांतर केले जाऊ शकते.
  • "आपल्या शत्रूंची ताकद वाढवा" याचे भाषांतर, "आपल्या शत्रूंना बलवान बनवण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
  • "मरणातून कोणालातरी जिवंत करणे" या वाक्यांशाचे भाषांतर "एखाद्याला मृत्यूपासून जीवनात परत येण्यास कारणीभूत होणे" किंवा "एखाद्याला जीवनात परत येण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "वर उचलणे" चे भाषांतर "पुरवणे" किंवा "नियुक्त" किंवा "असण्यास कारण होणे" किंवा "उभारणे" किंवा "पुनर्बांधणी" किंवा "दुरुस्ती" असे देखील केले जाऊ शकते.
  • "उठला आणि गेला" या वाक्यांशाचे भाषांतर "उठले आणि गेले" किंवा "गेले" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "उठला" या शब्दाचे भाषांतर "प्रारंभ झाला" किंवा "सुरवात झाली" किंवा "उठून उभा राहिला" या शब्दाचे भाषांतर "उभा राहिला" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: पुनरुत्स्थान, नियुक्त, उच्च करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 21:14 संदेष्टयांनी भविष्य केले होते की मसिहा मरेल आणि देव त्याला पुन्हा जीवंतसुद्धा करील.

  • 41:05 येशू येथे नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे तो मेलेल्यातून उठला आहे!

  • 43:07 "जरी येशू मरण पावला होता, तरी देवाने त्यास मेलेल्यांतून पुन्हा उठविले. या घटनेद्वारे ही भविष्यवाणी पूर्ण होते, ‘तू आपल्या पवित्रास कबरेमध्ये कुजू देणार नाहीस. आम्ही या गोष्टीविषय़ीचे साक्षीदार आहेत की देवाने येशूला मरणातून पुन्हा उठविले आहे."

  • 44:05 तुम्ही जीवनदात्यास ठार मारिले, परंतु देवाने त्यास मेलेल्यांतून पुन्हा उठविले.

  • 44:08 पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरा होऊन तुम्हापुढे उभा आहे. तुम्ही येशूला खिळले, परंतु देवाने त्यास पुन्हा जिवंत केले!

  • 48:04 अर्थात सैतान मसिहास जीवे मारील, परंतु देव त्यास पुन्हा जिवंत करील आणि मग मसिहा सैतानाच्या सत्तेचा संपूर्ण नायनाट करील.

  • 49:02 तो पाण्यावर चालला, वादळ शांत केले, अनेक आजा-यांना बरे केले, दुष्टात्म्यांना बाहेर काढले, मेलेल्यांना जिवंत केले व पाच भाकरी व दोन मासळ्यांद्वारे 5,000 पेक्षा अधिक लोकांना पोटभर जेवू घातले.

  • 49:12 तुम्ही असा विश्वास धरिला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, व देवाने त्यास पुन्हा जिवंत केले आहे.

  • Strong's: H2210, H2224, H5549, H5782, H5927, H5975, H6209, H6965, H6966, H6974, H7613, H7721, G305, G386, G393, G450, G1096, G1326, G1453, G1525, G1817, G1825, G1892, G1999, G4891