mr_tw/bible/other/prostitute.md

3.7 KiB

वेश्या, दुराचारी स्त्री (वेश्या)

व्याख्या:

"वेश्या" आणि "दुराचारी" हे दोन्ही शब्द अशा व्यक्तीला संदर्भित करतात, जो पैश्यासाठी किंवा धार्मिक विधी म्हणून लैंगिक कृत्ये करतो. वेश्या किंवा दुराचारी या सहसा स्त्रिया असतात, पण काही पुरुष देखील असतात.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "वेश्या" हा शब्द काहीवेळा लाक्षणिक अर्थाने, अशा व्यक्तीला संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, जो खोट्या देवाची उपासना करतो किंवा जो जादू-टोना करतो.
  • "दुराचाऱ्यासारखे वागणे" या अभिव्यक्तीचा अर्थ लैंगिकदृष्ट्या अनैतिक होऊन वेश्येसारखे वागणे असा होतो. * पवित्र शास्त्रामध्ये, या अभिव्यक्तीचा देखील उपयोग अशा व्यक्तीला संदर्भित करण्यासाठी केला जातो, जो मूर्तींची उपासना करतो.
  • एखाद्या वस्तूसाठी "स्वतःला वेश्या बनवणे" ह्याचा अर्थ लैंगिकदृष्ट्या अनैतिक होणे, किंवा जेंव्हा लाक्षणिक अर्थाने वापरला जातो, तेंव्हा मूर्तींची उपासना करून देवाशी अविश्वासू होणे असा होतो.
  • प्राचीन काळात, काही मूर्तिपूजक मंदिरे पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या विधीचा भाग म्हणून वेश्या बनवत असत.
  • या शब्दाचे भाषांतर, स्थनिक भाषेतील अशा शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते, ज्याचा संदर्भ वेश्याशी येतो. * काही भाषांमध्ये मृदूभाषित शब्द असू शकतात, ज्यांचा उपयोग ह्याच्यासाठी केला जाऊ शकतो. (पहा: युफेमिसम (अप्रिय गोष्ट सौम्य भाषेत सांगणे, शोभनभाषित)

(हे सुद्धा पहा: व्यभिचार, खोटे देव, लैंगिक अनैतिकता, खोट्या देवता)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: