mr_tw/bible/other/prosper.md

4.2 KiB

समृद्ध होणे, भरभराट, समृद्ध

व्याख्या:

"समृद्ध होणे" हा शब्द सामान्यत: चांगल्या जगण्याला संदर्भित करते आणि शारीरिक किंवा आध्यात्मिकरित्या भरभराटीचा संदर्भ घेऊ शकतो. जेव्हा लोक किंवा देश "समृद्ध" असतात,याचा अर्थ असा की ते श्रीमंत आहेत आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहे. ते "समृद्धी" अनुभवत आहेत.

  • "समृद्ध" हा शब्द सहसा पैसा आणि मालमत्ता मिळविण्यामध्ये किंवा लोकांना चांगले जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तयार करण्यामध्ये यशस्वी होण्यास सूचित करतो.
  • पवित्र शास्त्रात "समृद्ध" या संज्ञेमध्ये चांगले आरोग्य आणि मुलांनी आशीर्वादीत होणे हे देखिल समाविष्ट आहे.
  • एक "समृद्ध" शहर किंवा देश असे आहे की ज्यात बरेच लोक आहेत, अन्नाचे चांगले उत्पादन आहे आणि असे व्यवसाय जे भरपूर पैसे आणतात.
  • पवित्र शास्त्र शिकवते की जेव्हा एखादा व्यक्ती देवाच्या शिकवणीचे पालन करतो तेव्हा त्याची आध्यात्मिक प्रगती होईल. तो आनंद आणि शांतीचा आशीर्वाद देखील अनुभवेल. देव लोकांना नेहमीच भरपूर संपत्ती देत नाही, परंतु जेव्हा ते त्याच्या मार्गाने जातात तेव्हा तो नेहमीच आध्यात्मिक प्रगती करतो.
  • संदर्भानुसार, "समृद्धी" या शब्दाचे भाषांतर "आध्यात्मिकरित्या यशस्वी होणे" किंवा "देवाद्वारे आशीर्वादित होणे" किंवा "चांगल्या गोष्टींचा अनुभव घेणे" किंवा "चांगले राहणे" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • "समृद्ध" या शब्दाचे भाषांतर "यशस्वी" किंवा "श्रीमंत" किंवा "अध्यात्मिक फलदायी" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.
  • "समृद्धी" या शब्दाचे भाषांतर "कल्याण" किंवा "संपत्ती" किंवा "यश" किंवा "विपुल आशीर्वाद" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [आशीर्वाद देणे], [फळ], [आत्मा])

पवित्र शास्त्र संदर्भ:

  • [1 इतिहास 29: 22-23]
  • [अनुवाद 23:06]
  • [ईयोब 36:11]
  • [लेवीय 25: 26-28]
  • [स्तोत्रसंहीता 001: 3]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1129, एच 1767, एच 1878, एच 2428, एच 2896, एच 3027, एच 3190, एच 3448, एच 3787, एच 4195, एच 5381, एच 6500