mr_tw/bible/other/profit.md

4.7 KiB

लाभ, लाभदायक, नुकसानदाय

व्याख्या:

सर्वसाधारणपणे, "लाभ" आणि "लाभदायक" या संज्ञा विशिष्ट क्रिया किंवा वर्तन करून काहीतरी चांगले मिळवण्याचा संदर्भ देते.

एखाद्यास काहीतरी "लाभदायक" जेव्हा ते चांगल्या गोष्टी करतात किंवा इतर लोकांसाठी चांगल्या गोष्टी करण्यास मदत करतात.

  • विशेष म्हणजे, "लाभ" हा शब्द बऱ्याचदा व्यवसायातून मिळवलेल्या पैशाचा संदर्भ देतो. एखादा व्यवसाय खर्च करण्यापेक्षा जास्त पैसे मिळवतो तेव्हा तो "लाभदायक" असतो.
  • जर लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्यास कृती लाभदायक ठरतात.
  • 2 तीमथ्य: 3:16 सांगते की सर्व शास्त्रवचने लोकांना धार्मिकतेने सुधारण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी "लाभदायक" आहेत. याचा अर्थ असा की पवित्र शास्त्रातील शिकवणी लोकांना देवाच्या इच्छेनुसार जगण्यास शिकवण्यासाठी मदतगार आणि उपयुक्त आहेत.

"नुकसानदायक" या शब्दाचा अर्थ उपयुक्त असा नाही.

  • याचा शाब्दिक अर्थ असा आहे की काहीही फायदा न होणे किंवा एखाद्याला काहीही मिळविण्यात मदत न करणे.
  • काहीतरी नुकसानदायक असे करणे फायद्याचे नाही कारण यामुळे कोणताही फायदा होत नाही.
  • याचे भाषांतर "निरुपयोगी" किंवा "कुचकामी" किंवा "उपयोगी नसणे" किंवा "अयोग्य" किंवा “फायदेशीर नाही” किंवा “कोणताही फायदा न होणे" असे म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [पात्र]

भाषांतरातील सूचना:

  • संदर्भानुसार, "लाभ" या शब्दाचे भाषांतर "फायदा" किंवा "मदत" किंवा "नफा" असे म्हणून देखील केले जाऊ शकते
  • "लाभदायक" या शब्दाचे भाषांतर "उपयुक्त" किंवा "फायदेशीर" किंवा "मदतगार" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • एखाद्या गोष्टीचा "लाभ" या शब्दाचे भाषांतर "फायदा घ्या" किंवा "पैसे मिळवा" किंवा "मदत मिळवा" असे केले जावू शकते.
  • व्यवसायाच्या संदर्भात, "लाभ" या संज्ञेचे भाषांतर शब्द किंवा वाक्यांशासह अनुवादित केला जाऊ शकतो ज्याचा अर्थ "पैसा मिळवले" किंवा "पैशाचा अधिशेष" किंवा "अतिरिक्त पैसे" असा होतो.

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [ईयोब 15:03]
  • [नीतिसूत्रे 10: 16]
  • [यिर्मया 02:08]
  • [यहेज्केल18: 12-13]
  • [योहान 06:63]
  • [मार्क 08:36]
  • [मत्तय 16:26]
  • [2 पेत्र 02: 1-3]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1215, एच 3148, एच 3276, एच 4504, एच 4768, एच 5532, एच 7737, जी 147, जी 255, जी 812, जी 88, जी 880, जी 125