mr_tw/bible/other/perverse.md

4.3 KiB

हेकट, विकृत रूप, विकृत, दुर्भावनायुक्त, भ्रष्ट, द्वेषयुक्त, कपटी, बेईमान, विकृती

व्याख्या:

"हेकट" हा शब्द एखाद्या व्यक्तीचे किंवा क्रियेचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो जो नैतिकदृष्ट्या कुटिल किंवा वक्र आहे. "विकृतपणे"या शब्दाचा अर्थ "विकृत पद्धतीने" असा आहे. काहीतरी "विकृत" करणे म्हणजे त्यास पिळणे किंवा त्यास योग्य किंवा चांगले असलेल्यापासून दूर करणे होय.

  • एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू विकृत आहे ती चांगल्या आणि योग्य गोष्टीपासून विचलित झाली आहे.
  • पवित्र शास्त्रात, जेव्हा इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले तेव्हा त्यांनी विकृत कृत्य केले. ते अनेकदा खोट्या देवतांची उपासना करून असे केले.
  • कोणतीही कृती जी देवाच्या मानदंडांविरूद्ध किंवा वर्तनाविरूद्ध आहे ती विकृत मानली जाते.
  • "हेकट" या संज्ञाला भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये संदर्भानुसार "नैतिकरीत्या वाकडे" किंवा "अनैतिक" किंवा "देवाच्या सरळ मार्गापासून दूर जाणे" या वाक्यांशाचा समावेश असू शकतो.
  • "हेकट भाषण" या वाक्यांशाचे भाषांतर "वाईट पद्धतीने बोलणे" किंवा "कपटी चर्चा" किंवा "बोलण्याचा अनैतिक मार्ग" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • "विकृत लोक" या वाक्यांशाचे वर्णन "अनैतिक लोक" किंवा "नैतिकरित्या विचलित झालेले लोक" किंवा "सतत देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारे लोक" असे केले जाऊ शकते.
  • "विकृतपणे वागणे" या वाक्यांशाचे भाषांतर "वाईट पद्धतीने वागणे" किंवा "देवाच्या आज्ञेविरूद्ध गोष्टी करणे" किंवा "देवाच्या शिकवणीस नकार देणाऱ्या मार्गाने जगणे" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • "विकृत" या शब्दाचे भाषांतर "भ्रष्ट होण्याचे कारण" किंवा "कोणत्या तरी वाईट गोष्टीकडे वळणे" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [भ्रष्ट], [फसविणे], [उल्लंघन], [वाईट], [वळणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 राजे 08:47]
  • [1 शमुवेल 20:30]
  • [ईयोब 33: 27-28]
  • [लुक 23:02]
  • [स्तोत्रसंहीता 101: 4-6]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: H1942, H2015, H3868, H4297, H5186, H5557, H5558, H5753, H5766, H5791, H6140, H8138, H8397, H841