mr_tw/bible/other/overseer.md

4.3 KiB

देखरेख, देखरेख करणारा, देखभालकर्ता

व्याख्या:

"देखरेख करणारा" या शब्दाचा अर्थ असा आहे की जो इतर लोकांच्या कामाचा आणि कल्याणाचा प्रभारी आहे. पवित्र शास्त्रात बऱ्याचदा "देखभालकर्ता"या शब्दाचा अर्थ "देखरेख करणारा" असतो

  • जुन्या करारात, एका देखरेख करणाऱ्याचे काम त्याच्या अंतर्गत कामगारांनी चांगले काम केले आहे का याची खात्री करण्याचे होते.
  • नवीन करारामध्ये हा शब्द सुरुवातीच्या ख्रिस्ती मंडळीच्या पुढाऱ्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. त्यांचे कार्य मंडळीच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेणे हे होते, जेणेकरून विश्वासणाऱ्यांना पवित्र शास्त्राचे अचूक शिक्षण मिळावे याची खात्री करत असे.
  • पौल एखाद्या देखरेख करणाऱ्याचा उल्लेख एखाद्या मेंढपाळासारखा करतो जो स्थानिक मंडळीतील विश्वासणाऱ्यांची काळजी घेतो, जो त्याचा "कळप" आहे.
  • मेंढपाळाप्रमाणे, देखरेख करणारा, कळपावर लक्ष ठेवतो. तो विश्वासू लोकांचे खोट्या आध्यात्मिक शिक्षण आणि इतर वाईट प्रभावांपासून काळजी घेतो आणि त्यांचे संरक्षण करतो.
  • नवीन करारामध्ये, "देखरेख करणारे,""वडील" आणि "मेंढपाळ / पाळक" या संज्ञांचे समान आध्यात्मिक पुढाऱ्याला संदर्भित करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत.

भाषांतरातील सूचना

  • या शब्दाचे भाषांतर करण्याचे इतर मार्ग म्हणजे "पर्यवेक्षक"किंवा "काळजीवाहू" किंवा "व्यवस्थापक"
  • देवाच्या लोकांच्या स्थानिक गटातील पुढाऱ्यांचा संदर्भ घेताना, या संज्ञाचे भाषांतर एखादा शब्द किंवा वाक्यांशासह केले जाऊ शकते ज्याचा अर्थ "अध्यात्मिक पर्यवेक्षक" किंवा "विश्वासणाऱ्यांच्या गटाच्या आध्यात्मिक गरजा भागविणारा एखादा व्यक्ती" किंवा "मंडळीच्या आध्यात्मिक गरजा भागविणारा व्यक्ती" असा होतो.

(हे देखील पाहा: [मंडळी], [वडील], [पाळक], [मेंढपाळ])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 इतिहास 26:31-32]
  • [1 तीमथ्याला पत्र 03:02]
  • [प्रेषिताचे कृत्ये 20:28]
  • [उत्पत्ति: 41:33-34]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 01:01]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 5329, एच 6485, एच 6496, एच 7860, एच 8104, जी 1983, जी 1984, जी 1985