mr_tw/bible/other/ordain.md

2.4 KiB

दिक्षा देणे, दिक्षा दिली, धर्माधिकारदिक्षा, खूप पूर्वी नियोजित केले, व्यवस्था, तयार केले

व्याख्या:

दिक्षा देणे म्हणजे एखाद्या विशिष्ट कार्यासाठी किंवा भूमिकेसाठी एखाद्या व्यक्तीस औपचारिकरित्या नियुक्त करणे. याचा अर्थ औपचारिकरित्या नियम किंवा फर्मान बनवणे देखील आहे.

  • "दिक्षा देणे" या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्याला याजक, मंत्री किंवा रब्बी म्हणून औपचारिकरित्या नियुक्त करणे होय.
  • उदाहरणार्थ, देवाने अहरोन आणि त्याच्या वंशजांना याजक म्हणून नेमले.
  • याचा अर्थ असा आहे की एखादी धार्मिक मेजवानी किंवा करार यासारखे काहीतरी सुरु करणे किंवा स्थापित करणे.
  • संदर्भानुसार, "दिक्षा देणे" या वाक्यांशाचे भाषांतर "नेमणे" किंवा "नियुक्त करणे" किंवा "आज्ञा देणे" किंवा "नियम बनविणे" किंवा "सुरु करणे" असे म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [आज्ञा देणे], [करार], [फर्मान], [कायदा], [नियम], [याजक])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 राजे 12:31-32]
  • [2 शमुवेल 17: 13-14]
  • [निर्गम 28:40-41]
  • [गणना 03:03]
  • [स्तोत्रसंहीता 111: 7-9]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 3245, एच 4390, एच 6186, एच 6213, एच 6680, एच 7760, एच 8239, जी 1299, जी 2525, जी 4270, जी 4282