mr_tw/bible/other/onhigh.md

2.1 KiB

उंचावर, उर्ध्वलोकी (परम उंचावर)

व्याख्या:

"उंचावर" आणि "उर्ध्वलोकी" हे शब्द, या अभिव्यक्ती आहेत, ज्यांचा सहसा अर्थ "स्वर्गात" असा होतो.

  • "उर्ध्वलोकी" या अभिव्यक्तीचा दुसरा अर्थ "अतिशय सन्मानित" असा होऊ शकतो.
  • शब्दशः या अभिव्यक्तीचा उपयोग, "परम उंचाचे झाड" या अभिव्यक्तीमध्ये केला जाऊ शकतो, ज्याचा अर्थ, "सर्वात उंच असलेले झाड" असा होतो.
  • "उंचावर" या अभिव्यक्तीचा संदर्भ उंच आकाशात असण्याशी सुद्धा येतो, जसे की, पक्षाचे घरटे जे उंचावर असते. संदर्भामध्ये ह्याचे भाषांतर, "उंच आकाशात" किंवा "उंच झाडाच्या टोकावर" असे केले जाऊ शकते.
  • "उंच" हा शब्द सुद्धा, एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूचे उच्च स्थान किंवा महत्व सूचित करतो.
  • "उंचावरून" या अभिव्यक्तीचे भाषांतर "स्वर्गातून" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: स्वर्ग, सन्मान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: