mr_tw/bible/other/obey.md

5.2 KiB

आज्ञा पाळणे, पालन करने

व्याख्या:

"आज्ञा" या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा कायद्याने आज्ञा दिल्यानुसार करणे होय." आज्ञाधारक" या शब्दामध्ये आज्ञा पाळणाऱ्याचे वर्णन केले आहे. "चोरी करू नको” म्हणून कधीकधी आज्ञा काहीतरी करण्यास मनाई करते. या प्रकरणात,"आज्ञा पाळणे" म्हणजे चोरी न करणे. पवित्रशास्त्रात बऱ्याचदा "पालन करणे" या शब्दाचा अर्थ "पाळणे" असा आहे.

  • सहसा "आज्ञा पाळणे" हा शब्द अधिकार असलेल्या व्यक्तीच्या आज्ञा किंवा कायद्यांचे पालन करण्याच्या संदर्भात वापरला जातो. उदाहरणार्थ, लोक देश, राज्य किंवा इतर संस्थेच्या पुढाऱ्यांनी तयार केलेले कायदे पाळतात.
  • मुले त्यांच्या पालकांची आज्ञा पाळतात, लोक देवाचे पालन करतात आणि नागरिक त्यांच्या देशाच्या नियमांचे पालन करतात.
  • जेव्हा प्राधिकरणातील एखादी व्यक्ती लोकांना काहीतरी न करण्याची आज्ञा देते तेव्हा ते तसे न करता आज्ञेचे पालन करतात.
  • आज्ञा पाळण्याच्या मार्गांमध्ये एक शब्द किंवा वाक्यांश समाविष्ट होऊ शकतो ज्याचा अर्थ "जी आज्ञा दिली आहे ते करा" किंवा "आदेशाचे अनुसरण करा" किंवा "देव जे करण्यास सांगतो तसे करा."
  • "आज्ञाधारक" या शब्दाचे भाषांतर "जी आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे करणे" किंवा "आदेशाचे अनुसरण करणे" किंवा "देव आज्ञा देतो त्याप्रमाणे करणे" असे म्हणून केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [नागरिक], [आदेश], [आज्ञा मोडणे], [राज्य], [कायदा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [प्रेषितांचे कृत्ये 05:32]
  • [प्रेषितांचे कृत्ये 06: 7]
  • [उत्पत्ति 28: 6-7]
  • [याकोब 01:25]
  • [याकोब 02:10]
  • [लुक 06:47]
  • [मत्तय 07:26]
  • [मत्तय 19: 20-22]
  • [मत्तय 28:20]

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • __ [03:04] __ नोहाने देवाच्या आज्ञेचे पालन केले. त्याने आणि त्याच्या तीन मुलांनी देवाने ज्या प्रकारे त्यांना सांगितले त्याप्रमाणे तो तारु बांधला.
  • [05:06] पुन्हा अब्राहामाने देवाच्या आज्ञेचे पालन केले आणि आपल्या मुलाचा अर्पण करण्यास तयार केले.
  • [05:10] "तू (अब्राहम) माझे__आज्ञा पालन केल्यामुळे__, जगातील सर्व कुटुंबे तुझ्या कुटुंबाद्वारे आशीर्वादित होतील"
  • [05:10] परंतु मिसरी लोकांनी देवावर विश्वास ठेवला नाही किंवा त्याच्या __ आज्ञांचे पालन केले__ नाही.
  • [13:07] जर लोक ह्या नियमांचे _पालन करतील, तर देव त्यांना वचन देतो की तो त्यांना आशीर्वाद देईल व त्यांचे संरक्षण करील.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1697, एच 2388, एच 3349, एच 4928, एच 7181, एच 8085, एच 8086, जी 8104, जी 3980, जी 3982, जी 5084, जी 5219,