mr_tw/bible/other/mourn.md

3.1 KiB

शोक करणे, शोक केला, शोक करण्याचे, शोक करणारा, शोक करणारे, शोकाकुल, दुःखी

तथ्य:

"शोक करणे" आणि "शोक करण्याचे" या शब्दांचा संदर्भ गंभीर दुःखाशी येतो, सहसा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रतिसादात केला जातो.

  • अनेक संस्कृतीत, शोक करण्यामध्ये बाहेरील विशिष्ठ स्वभावाचा समावेश होतो, जे खिन्नता आणि दुःख दर्शवतो.
  • प्राचीन काळातील, इस्राएली आणि इतर लोक समूह विलाप आणि खंत करून शोक व्यक्त करीत असत. ते गोणपाटापासून बनवलेले खरखरीत कपडे धारण करत असत, आणि स्वतःवर राख ताकत असत.
  • नियुक्त केलेले शोक करणारे, सहसा स्त्रिया, या मोठ्याने विलाप आणि खंत एखादा व्यक्ती मेल्यापासून, त्या मृत शरीराला कबरेमध्ये ठेवेपर्यंत करत असत.
  • शोक करण्याचा विशिष्ठ कालावधी हा सात दिवसांचा असे, पण तो कदाचित तीस दिवसपर्यंत, (जसे की मोशे आणि अहरोन ह्यांच्यासाठी) किंवा सत्तर दिवसपर्यंत (जसे याकोबासाठी) लांबत असे.
  • पवित्र शास्त्र सुद्धा या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने पापामुळे "शोक करण्याबद्दल" सांगते. ह्याचा संदर्भ, देवाला आणि लोकांना पापामुळे होणाऱ्या अतिशय दुःखी भावनेशी येतो

(हे सुद्धा पहा: गोणपाट, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: