mr_tw/bible/other/memorialoffering.md

3.2 KiB

आठवणी दाखल (स्मरणार्थ), स्मरण करून देणारे अन्नार्पण (स्मारक अर्पण)

व्याख्या:

"स्मरणार्थ" या शब्दाचा संदर्भ कृती किंवा वास्तूशी आहे, जे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला आठवणीत ठेवण्यासाठी कारणीभूत होते.

  • या शब्दाचा उपयोग विशेषण म्हणून जी गोष्ट आठवणीत ठेवायाची आहे त्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी केला जातो, जसे की "स्मरण करून देणारे अन्नार्पण," बलिदानाचा "आठवणीदाखल काही भाग" किंवा "स्मारक दगड (स्तंभ)."
  • जुन्या करारामध्ये, स्मारक अर्पण करण्यात आले, जेणेकरून इस्राएली लोकांना, देवाने त्यांच्यासाठी काय केले होते हे आठवणीत राहील.
  • देवाने इस्राएलमधील याजकांना स्मारक दगड असलेल्या विशेष पोशाखांना घालण्यास सांगितले. या दगडांवर इस्राएलाच्या बारा कुळांची नवे कोरलेली होती. हे कदाचित त्यांना देवाच्या विश्वासूपणाची आठवण करून देत असे.
  • नवीन करारामध्ये, देवाने कुरनेलीयुस नावाच्या मनुष्याचा सन्मान केला, कारण गरिबांसाठी तो करत असलेली दयाळूपनाची कृत्ये. या कृत्यांना देवासमोर "आठवणीदाखल" असे म्हंटले गेले आहे.

भाषांतर सूचना

याचे भाषांतर "स्थायी स्मरणपत्र" म्हणून देखील केले जाऊ शकते.

  • "स्मारक दगड (स्तंभ)" ह्याचे भाषांतर "त्यांना (एखाद्या गोष्टीची) आठवण करून देणारा दगड (स्तंभ)" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: