mr_tw/bible/other/meditate.md

2.4 KiB

मनन करणे, ध्यान लावणे, ध्यान (विचार)

व्याख्या:

"मनन करणे" या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीचा काळजीपूर्वक आणि गंभीर विचार करण्यात वेळ घालवणे असा होतो.

  • पवित्र शास्त्रामध्ये या शब्दाचा उपयोग सहसा देवाबद्दल आणि त्याच्या शिक्षणाबद्दल विचार करण्याच्या संदर्भात आला आहे.
  • स्तोत्र 1 मध्ये असे सांगितले आहे की, जो पुरुष देवाच्या वचनांचे "रात्रंदिवस" मनन करतो, तो अतिशय आशीर्वादित होतो.

भाषांतर सूचना:

  • "चे मनन करणे" ह्याचे भाषांतर, "च्या बद्दल काळजीपूर्वक आणि गंभीर विचार करणे" किंवा "विचारपूर्वक समजणे" किंवा "च्या बद्दल बऱ्याचदा विचार करणे" असे केले जाऊ शकते.
  • त्याचे तयार झालेले नाम "ध्यान" ह्याचे भाषांतर, "गंभीर विचार" असे केले जाऊ शकते. एक वाक्यांश "माझ्या मनाचे विचार" ह्याचे भाषांतर, "मी कश्याबद्दल खोल विचार करतो" किंवा "मी कश्याबद्दल बऱ्याचदा विचार करतो" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: