mr_tw/bible/other/lover.md

3.1 KiB

प्रियकर

व्याख्या:

  • "प्रियकर" या शब्दाचा शब्दशः अर्थ "प्रेम करणारा व्यक्ती" असा होतो. सहसा ह्याचा संदर्भ अशा लोकांशी आहे, जे एकमेकांशी लैंगिक संबंधामध्ये आहेत.

  • जेंव्हा "प्रियकर" या शब्दाचा उपयोग पवित्र शास्त्रामध्ये केला जातो, तेंव्हा त्याचा संदर्भ एखाद्या व्यक्तीशी येतो, जो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर ती किंवा तो ह्यांच्याबरोबर लग्न झाले नसले तरीही लैंगिक साबंधामध्ये असतो.

  • पवित्र शास्त्रामध्ये, या चुकीच्या लैंगिक संबंधाचा सहसा उपयोग इस्राएलाने मूर्तींची उपासना करून देवाच्या केलेल्या अवज्ञेच्या संदर्भात केला आहे. म्हणून "प्रियकर" या शब्दाचा लाक्षणिक अर्थाने उपयोग मूर्तींना संदर्भित करण्यासाठी होतो, ज्याची इस्राएली लोकांनी उपासना केली. या संदर्भामध्ये, या शब्दाचे शक्य भाषांतर "अनैतिक जोडीदार" किंवा "व्याभिचारातील जोडीदार" किंवा "मुर्त्या" या शब्दांनी केले जाऊ शकते. पहा: रूपक

  • पैश्याचा "प्रियकर" हा असा कोणीतरी आहे, जो सर्वात जास्त महत्व ओऐसे कमावण्यास आणि श्रीमंत होण्या देतो.

  • जुन्या करारातील पुस्तक गीतरत्न या मध्ये, "प्रियकर" या शब्दाचा उपयोग सकारात्मक मार्गाने केला आहे.

(हे सुद्धा पहा: व्यभिचार, खोटे देव, प्रेम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: