mr_tw/bible/other/like.md

5.3 KiB

सारखे, एकसारख्या विचाराचे, समानता, त्यासारखे, तसेच, वेगळे, जसे की.

व्याख्या:

"सारखा" आणि "सारखेपणा" हे शब्द काहीतरी सारखे किंवा च्या समान, काहीतरी दुसरे या शब्दांना संदर्भित करते.

  • "सारखा"हा शब्द बऱ्याचदा "एक अर्थालंकार" नावाच्या अलंकारिक अभिव्यक्तीमध्ये देखील वापरला जातो ज्यात एखाद्या गोष्टीची तुलना दुसऱ्या कशाशी केली जाते, सहसा सामायिक वैशिष्ट्य अधोरेखित करते. उदाहरणार्थ, "त्याचे कपडे सूर्यासारखे चमकले" आणि "गडगडाटीसारखा आवाज झाला." (पाहा: [एक अर्थालंकार]
  • "सारखा" किंवा "सारखा वाटणे" किंवा "सारख्या दिसणे" एखाद्या गोष्टीचे किंवा एखाद्याचे गुण ज्याची तुलना केली जात आहे त्या वस्तू किंवा व्यक्तीसारखे असणे.
  • लोक देवाच्या "समानतेत" म्हणजेच त्याच्या "प्रतिरुपात" निर्माण झाले. याचा अर्थ असा आहे की त्यांच्यात असे गुण किंवा वैशिष्ट्ये आहेत, जसे "सारखे" किंवा "समान" देवाचे गुण आहेत जसे विचार करण्याची, आणि भावना, आणि संवाद साधण्याची क्षमता.
  • एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्याची "समानता" असणे म्हणजे ती गोष्ट किंवा व्यक्तीसारखे वैशिष्ट्ये असणे.

भाषांतरातील सूचना

  • काही संदर्भांमध्ये, "समानता" या अभिव्यक्तीचे भाषांतर "जे सारखे दिसते" किंवा "जे दिसते ते" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • "त्याच्या मृत्यूच्या समानतेत" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्याच्या मृत्यूच्या अनुभवात भाग घेणे" किंवा "जणू त्याच्याबरोबर त्याच्या मृत्यूचा अनुभव घेत आहे" असे केले जावू शकते.
  • "शारीरिक देहाच्या समानतेत" या अभिव्यक्तीचे भाषांतर "पापी मानवासारखे असणे" किंवा "मानव असणे" असे म्हणून केले जाऊ शकते. येशू पापी असल्यासारखे या अभिव्यक्तीचे भाषांतर होणार नाही याची खात्री करा.
  • "त्याच्या स्वत: च्या समानतेमध्ये" या वाक्यांशाचे भाषांतर “त्याच्यासारखे व्हा" किंवा "त्याच्यासारखे बरेच गुण असलेले" असे देखील केले जाऊ शकते
  • नाशवंत माणसाची प्रतिमा, पक्षी, चार पायांचे प्राणी आणि रेंगाळणाऱे प्राणी यांच्या समानतेत या अभिव्यक्ती भाषांतर "नाशवंत मानवांसारखे दिसण्यासाठी तयार केलेल्या मूर्ती, किंवा पक्षी, पशू आणि लहान, रेंगाळणारे प्राणी असे केले जावू शकते."

(हे देखील पाहा: [पशू], [शरीर], [देवाची प्रतिरुप], [प्रतिमा], [नाश होणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [यहेज्केल 01:05]
  • [मार्क 08:24]
  • [मत्तय 17:02]
  • [मत्तय 18:03]
  • [स्तोत्रसंहीता 073:05]
  • [प्रकटीकरण 01: 12-13]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1823, एच 8403, एच 8544, जी 1503, जी 2509, जी 2531, जी 2596, जी 3664, जी 3666, जी 3668, जी 3668, जी 3697, जी 383