mr_tw/bible/other/know.md

6.3 KiB

माहित आहे, ज्ञान, अज्ञात, वेगळे करणे

व्याख्या:

"माहित" आणि "ज्ञान" या शब्दाचा अर्थ सामान्यत: काहीतरी किंवा एखाद्यास समजणे होय. याचा अर्थ एखाद्या तथ्याबद्दल जागरूक असणे किंवा एखाद्या व्यक्तीशी परिचित असणे देखील असू शकते. "माहीत होणे" या अभिव्यक्तीचा अर्थ माहिती सांगणे होय.

  • "ज्ञान" हा शब्द लोकांना माहित असलेल्या माहितीचा संदर्भ देतो. हे भौतिक संकल्पना किंवा अमूर्त संकल्पना जाणून घेण्यासाठी लागू होऊ शकते.
  • देवाबद्दल "माहित असणे" म्हणजे त्याने आपल्याबद्दल जे काही प्रकट केले त्या कारणास्तव त्याच्याबद्दलचे तथ्य समजून घेणे.
  • "माहित" असणे म्हणजे त्याच्याशी संबंध असणे. हे लोकांना जाणून घेण्यासाठी देखील लागू होते.
  • देवाची इच्छा जाणून घेणे म्हणजे त्याने काय आज्ञा दिली आहे याची जाणीव असणे किंवा एखाद्या व्यक्तीने काय करावे हे त्याला समजणे
  • "नियम माहीत होणे" म्हणजे देवाने काय आज्ञा दिली आहे याची जाणीव असणे किंवा त्याने मोशेला दिलेल्या नियमांमध्य देव काय सुचवितो हे समजून घेणे.
  • कधीकधी "ज्ञान" हा शब्द "बुद्धी" या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो, ज्यात देवाला संतोषविणाऱ्या मार्गाने जगणे समाविष्ट आहे
  • "देवाचे ज्ञान" कधीकधी "याहवेचे भय" या वाक्याचा समानार्थी शब्द म्हणून वापरले जाते.

भाषांतरातील सूचना

  • संदर्भानुसार, "माहित असणे" भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये "समजणे" किंवा "जाणून घेणे" किंवा "जागरूक असणे" किंवा "संपर्क असणे" किंवा "संबंध असणे" समाविष्ट असू शकते
  • दोन गोष्टींमधील फरक समजून घेण्याच्या संदर्भात, हा शब्द सहसा "वेगळे करणे" असे म्हणून अनुवादित केला जातो. जेव्हा अशा प्रकारे वापरला जातो तेव्हा हा शब्द बऱ्याचदा "दरम्यान" हे शब्दयोगी अव्यय असतो.
  • काही भाषांमध्ये "माहित असणे" यासाठी दोन भिन्न शब्द असतात, एक तथ्य जाणून घेण्यासाठी आणि एक व्यक्ती जाणून घेण्यासाठी आणि त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी.
  • "माहीत करणे" या शब्दाचे भाषांतर "लोकांना जाणून घेण्यास कारणीभूत" किंवा "प्रकट करणे" किंवा "च्या बद्दल सांगणे" किंवा "स्पष्टीकरण देणे" असे म्हणून केले जाऊ शकते
  • काहीतरी "माहीत करुन घेणे" या वाक्यांशाचे भाषांतर "च्याबद्दल जागरूक होणे" किंवा "परिचित होणे" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • "माहीत कसे करावे" या अभिव्यक्तीचा अर्थ प्रक्रिया किंवा काहीतरी करण्याची पद्धत समजून घेणे होय. त्याचे भाषांतर "सक्षम होणे" किंवा "कौशल्य असणे" असे म्हणून देखील केले जाऊ शकते.
  • संदर्भानुसार "ज्ञान" या शब्दाचे भाषांतर "जे ज्ञात आहे" किंवा "बुद्धी" किंवा "समज" म्हणून देखील केले जाऊ शकते.

(हे देखील पाहा: [नियम], [प्रकट करणे], [समजून घेणे], [शहाणे])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 करिंथकरांस पत्र 02: 12-13]
  • [1 शमुवेल 17:46]
  • [2 करिंथकरांस 02:15]
  • [2 पेत्र 01: 3-4]
  • [अनुवाद 04: 39-40]
  • [उत्पत्ति 19:05]
  • [लुक 01:77]

शब्द संख्या:

  • स्ट्रॉग्सचे: एच 1843, एच 1844, एच 1875, एच 3045, एच 4046, एच 4093, एच 4486, एच 5234, एच 5475, जी 50, जी 56, जी 107, जी 11