mr_tw/bible/other/judgeposition.md

2.9 KiB

न्यायाधीश, शास्ते

व्याख्या:

सहसा कायद्याशी संबंधित असलेल्या बाबीमध्ये, जेंव्हा लोकांच्यामध्ये वाद होतात, तेंव्हा न्यायाधीश हा असा व्यक्ती आहे, जो बरोबर आणि चुकीचे काय ह्याचा निर्णय देतो.

  • पवित्र शास्त्रामध्ये, देवाला सहसा न्यायाधीश म्हणून संदर्भित कण्यात आले आहे, कारण तो एक परिपूर्ण न्यायाधीश आहे, जो योग्य आणि अयोग्य ह्याचा अंतिम निर्णय देतो.
  • इस्राएली लोकांनी कनानच्या भूमीत प्रवेश केल्यानंतर आणि त्यांच्यावर राज्य करण्यासाठी राजा येण्याच्या अगोदर, देवाने त्यांच्या संकटाच्या समयी त्यांचे नेतृत्व करण्यास पुढारी नियुक्त केले त्यांना "शास्ते" असे म्हणत. बऱ्याचदा हे शास्ते हे सैन्याचे अधिकारी असत, जे इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंना पराजित करून सोडवत असत.
  • संदर्भाच्या आधारावर, "न्यायाधीश" या शब्दाला "निर्णय घेणारा" किंवा "पुढारी" किंवा "सोडवणारा" किंवा "शासक" असेही म्हंटले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: शासक, न्यायाधीश, कायदा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: