mr_tw/bible/other/judaism.md

2.3 KiB

यहुदी मतानुसार चालणारे, यहुदी धर्म

व्याख्या:

"यहुदी मतानुसार चालणारे" या शब्दाचा संदर्भ यहुद्यांनी केलेल्या धर्माशी येतो. याला "यहुदी धर्म" असेही संदर्भित केले आहे.

  • जुन्या करारामध्ये, "यहुदी धर्म" या शब्दाचा तर, नवीन करारामध्ये, "यहुदी मतानुसार चालणारे" या शब्दाचा उपयोग केला गेला आहे.
  • यहुदी मतानुसार चालणाऱ्यामध्ये सर्व जुन्या कराराचे नियम आणि सूचना आहेत, ज्यांना देवाने इस्राएली लोकांना पाल्यासाठी दिलेले होते. त्याच्यामध्ये रूढी आणि परंपरा, ज्याला यहुदी धर्मामध्ये कालांतराने जोडले गेले त्याचाही समावेश होतो.
  • जेंव्हा भाषांतर कराल, तेंव्हा "यहुदी धर्म" किंवा "यहुदी लोकांचा धर्म" या शब्दांचा उपयोग जुना करार आणि नवा करार दोन्हीमध्ये करता येईल.
  • तथापि, "यहुदी मतानुसार चालणारे" ह्याचा उपयोग फक्त नवीन करारामध्येच केला पाहिजे, कारण हा शब्द त्यापूर्वी अस्तित्वात नव्हता.

(हे सुद्धा पहा: यहुदी, नियम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: