mr_tw/bible/other/integrity.md

2.5 KiB

सात्विकता

व्याख्या:

"सात्विकता" या शब्दाचा संदर्भ प्रामाणिक असण्याशी येतो, आणि मजबूत नैतिक तत्वे आणि वर्तणूक असण्याला सात्विकता आहे असे म्हंटले जाते.

  • सात्विकता असणे म्हणजे जे प्रामाणिक आणि योग्य आहे, त्याची निवड करणे, जरी आपल्याला इतर कोणी बघत नसले तरीही.
  • पवित्र शास्त्रातील काही विशिष्ठ व्यक्तिरेखा, जसे की, योसेफ आणि दानीएल, ह्यांनी जेंव्हा वाईट करण्यास नकार दिला आणि देवाची आज्ञा पाळण्याची निवड केली, तेंव्हा त्यांची सात्विकता दिसून आली.
  • नीतीसुत्राच्या पुस्तकात असे सांगितले आहे की, गरीब असून सात्विक असणे हे, श्रीमंत असून भ्रष्ट आणि अप्रामाणिक असण्यापेक्षा बरे आहे.

भाषांतर सूचना

  • "सात्विकता" या शब्दाचे भाषांतर, "प्रामाणिकपणा" किंवा "नैतिक सरळपणा" किंवा "खरेपणाची वर्तणूक" किंवा "विश्वासयोग्य, प्रामाणिक रीतीने कार्य करणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: दानीएल, योसेफ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: