mr_tw/bible/other/inquire.md

2.9 KiB

चौकशी करणे, विचारणे, चौकशी

तथ्य:

"चौकशी करणे" या शब्दाचा अर्थ एखाद्याला माहिती विचारणे असा होतो. "ची चौकशी केली" या अभिव्यक्तीचा उपयोग, बऱ्याचदा देवाला ज्ञानासाठी किंवा मदतीसाठी विचारण्यासाठी केला जातो.

  • जुन्या करारामध्ये अनेक घटना नोंद केलेल्या आहेत, जिथे लोकांनी देवाला विचारले.
  • या शब्दाचा उपयोग राजा किंवा सरकारी अधिकाऱ्याच्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो, जो अधिकृत लिखित नोंदींचा शोध घेतो.
  • संदर्भाच्या आधारावर, "चौकशी करणे" याचे भाषांतर "विचारणे" किंवा "माहिती विचारणे" असे केले जाऊ शकते.
  • "यहोवाला विचारणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "यहोवाला मार्गदर्शन करण्यासाठी विचारणे" किंवा "यहोवाला काय करू असे विचारणे" असे केले जाऊ शकते.
  • "च्या बद्दल चौकशी करणे" हे असे काहीतरी आहे, ज्याचे भाषांतर "च्या बद्दल प्रश्न विचारणे" किंवा "च्या बद्दल माहिती विचारणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा यहोवा म्हणतो "तुमच्याकडून माझी विचारणा केली जाऊ शकणार नाही" ह्याचे भाषांतर "मी तुम्हाला मला माहिती विचारण्याची परवानगी देणार नाही" किंवा "तुम्हाला माझ्याकडून मदत मिळवण्याची परवानगी मिळणार नाही" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: