mr_tw/bible/other/honey.md

3.4 KiB

मध, मधाचे मोहोळ

व्याख्या:

"मध" हा गोड, चिकाट, खाण्यायोग्य पदार्थ आहे, ज्याला मधमाश्या फुलातील मधुर द्रव म्हणून बाहेर काढतात. मधाचे मोहोळ हे मेणासारखी दिसणारी रचना आहे, जिथे मधमाश्या मध साठवून ठेवतात.

  • प्रकारांवर आधारित, मध हा पिवळसर किंवा तपकिरी रंगाचा असू शकतो.
  • मध जंगलामध्ये आढळतो, जसे की, पोकळ झालेल्या झाडात, किंवा जिथे कुठे मधमाश्या घरटे बनवतील तिथे. मध तयार करून तो खाण्यासाठी किंवा विकण्यासाठी लोक माश्यांना पोळ्यात सुद्धा वाढवतात, पण पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केलेला मध हा बहुदा करून जंगली मध होता.
  • तीन लोक ज्यांचा पवित्र शास्त्रामध्ये जंगली मध खाणारे म्हणून उल्लेख केला गेला आहे, ते योनाथान, शिमसोन, आणि बाप्तिस्मा करणारा योहान हे आहेत.
  • या शब्दाचा उपयोग, लाक्षणिक अर्थाने एखादी गोष्ट जी गोड किंवा खूप आनंददायी आहे तिचे वर्णन करण्याकरिता केला आहे. उदाहरणार्थ, देवाची वचने आणि नियम ह्यांना "मधापेक्षा गोड" असे म्हंटले आहे. (हे सुद्धा पहा: हास्य, रूपक
  • काहीवेळा एखाद्या मनुष्याच्या शब्दांचे वर्णन मधापेक्षा गोड भासतात असे केले जाते, पण त्याएवजी त्याचा परिणाम फसवणूक आणि इतरांना हानी पोहोचवण्यासाठी होतो.

(हे सुद्धा पहा: (बाप्तिस्मा करणारा) योहान, योनाथन, पलीष्टी, शिमसोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: