mr_tw/bible/other/heal.md

6.6 KiB

बर होणे, बरे झाले, बरे करणे, बरे केले, उपचार, आरोग्यदाता, आरोग्य, निरोगी, रोगी

व्याख्या:

"बरे करणे" आणि "बर होणे" या दोन्ही शब्दांचा अर्थ आजारी, जखमी किंवा अपंग व्यक्ती पुन्हा निरोगी होण्यास कारणीभूत आहे.

  • जो व्यक्ती "बरा झाला आहे" किंवा "बरा केला आहे" त्याला "चांगले केले" किंवा "निरोगी केले" आहे.
  • बरे करणे नैसर्गिकरित्या उद्भवू शकते कारण देवाने आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या जखम आणि आजारांपासून बरे होण्याची क्षमता दिली आहे. असे प्रकारचे उपचार सहसा हळूहळू होतात.
  • तथापि, अंध किंवा अर्धांगवायूसारख्या काही विशिष्ट परिस्थिती आणि कुष्ठरोग्यासारखे काही गंभीर रोग मात्र स्वत: बरे होत नाहीत. जेव्हा लोक या गोष्टीत बरे होतात तेव्हा एक चमत्कार असतो जो सहसा अचानक होतो.
  • उदाहरणार्थ, येशूने आंधळे किंवा लंगडे किंवा आजारी असलेल्या बऱ्याच लोकांना बरे केले आणि ते लगेचच बरे झाले.
  • प्रेषितांनी चमत्कारिकरित्या लोकांना बरे केले, जसे की जेव्हा पेत्राने एका अपंग माणसाला ताबडतोब चालण्यास सक्षम केले.

(हे देखील पाहा: [चमत्कार])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [प्रेषितांचे कृत्ये 05:16]
  • [प्रेषितांचे कृत्ये 08:06]
  • [लुक 05:13]
  • [लुक 06:19]
  • [लुक 08:43]
  • [मत्तय 04: 23-25]
  • [मत्तय 09:35]
  • [मत्तय 13:15]

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • __[19:14]__शत्रुचा सेनापती, नामान याच्याबरोबर घडलेला एक चमत्कार, ज्याला एक भयानक त्वचेचा आजार होता. त्याने अलीशाबद्दल ऐकले होते म्हणून तो गेला आणि अलीशाला बरे करण्यास सांगीतले.
  • [21:10] त्याने (यशया) अशी देखील भविष्यवाणी केली की मसीहा आजारी लोकांना आणि जे ऐकू, पाहू, बोलू किंवा चालू शकत नाहीत त्यांना__बरे करील__.
  • [26:06] येशू असे म्हणत राहिला, "आणि संदेष्टा अलीशाच्या काळात, इस्राएलमध्ये त्वचेचे आजार असलेले बरेच लोक होते. परंतु अलीशाने त्यापैकी कोणालाच बरे केले नाही. त्याने फक्त इस्त्राएलाच्या शत्रुचा सेनापती नामान याला बरे केले."
  • [26:08] त्यांनी आजारी किंवा अपंग असलेल्या बऱ्याच लोकांना आणले, जे पाहू शकत नाही, चालू शकत नाही, ऐकू शकत नाही आहे किंवा बोलू शकत नाही आणि येशूने त्यांना बरे केले.
  • [32:14] तिने ऐकले होते की येशूने बऱ्याच आजारी लोकांना बरे केले आणि तिने विचार केला आहे, "मला खात्री आहे की जर मी फक्त येशूच्या कपड्यांना स्पर्श केला तरी, मी देखील बरी होईल! "
  • [44:03] ताबडतोब, देवाने लंगड्या मानसाला बरे केले , आणि तो चालू लागला आणि उडी मारू लागला आणि देवाची स्तुती करू लागला.
  • [44:08] पेत्राने त्यांना उत्तर दिले, "हा माणूस जो तुझ्यासमोर उभा आहे तो येशु जो मसीहा याच्या सामर्थ्याने बरा झाला आहे."
  • [49:02] येशूने पुष्कळ चमत्कार केले जे सिद्ध करतात की तो देव आहे. तो पाण्यावरून चालला, वादळाला शांत केले, बऱ्याच आजारी लोकांना__बरे केले__, भुते बाहेर काढली, मेलेल्यांना जिवंत केले आणि पाच भाकरी आणि दोन लहान मासे 5,000 पेक्षा जास्त लोकांना पुरेल एवढ्या अन्नात बदलले.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच724, एच1369, एच1455, एच2280, एच2421, एच2896, एच3545, एच4832, एच4974, एच7495, एच7499, एच7500, एच7725, एच7965, एच8549, एच8585, एच8644, एच622, जी1295, जी1743, जी2322, जी2323, जी2386, जी2390, जी2392, जी2511, जी3647, जी4982, जी5198, जी5199