mr_tw/bible/other/gate.md

3.9 KiB

फाटक (दार), वेशी, अडसर, द्वाररक्षक, रखवालदार, द्वार

व्याख्या:

एक "फाटक" हे घर किंवा शहराभोवती असणाऱ्या कुंपण किंवा भिंतीवरील प्रवेश बिंदूवर लटकावलेला अडथळा आहे. "अडसर" ह्याचा संदर्भ लाकडी किंवा धातूच्या संबंधात आहे, ज्याची अशा ठिकाणी हालचाल केली जाते जिथे फाटकाला कुलूप लावले जाऊ शकते.

  • एखाद्या शहराचे फाटक हे, लोकांना शहरामधून आत आणि बाहेर करण्यासाठी, प्राण्यांना, आणि माल प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी उघडले जाते.
  • शहराचे संरक्षण करण्यासाठी, त्याच्या भिंती आणि फाटक हे जाड आणि मजबूत असतात. शत्रू सैन्यांना शहरामध्ये प्रवेश करण्यापासून आडविण्यासाठी फाटक धातूंच्या किंवा लाकडाच्या दांड्यांनी बंद केले जाते.
  • एका शहराचा दरवाजा हा सहसा एखाद्या गावाच्या बातम्या आणि समाजाचे केंद्र होते. हे असे देखील होते जिथे व्यवसायाचे व्यवहार घडतात आणि निर्णय घेतले जातात, कारण शहराच्या भिंती इतक्या जाड होत्या की त्या फाटकाच्या प्रवेशद्वारातून गरम सूर्याची थंड सावली निर्माण करत होत्या. नागरीकांना आपला व्यवसाय चालवण्यासाठी सावलीत बसून न्यायालयीन खटल्यांचा न्याय करण्याकरिता ते आनंददायी वाटले.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "फाटक" या शब्दाचे भाषांतर "दरवाजा" किंवा "भिंतीतला मार्ग" किंवा "अडथळा" किंवा "प्रवेशमार्ग" अशा मार्गांनी केले जाऊ शकते.
  • "फाटकांचे अडसर" या वाक्यांशाचे भाषांतर, "फाटकांची कडी" किंवा "फाटक बंद करणारा लाकडी दांडी" किंवा "फाटकाला लॉक करणारे धातूची काडी" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: