mr_tw/bible/other/footstool.md

3.4 KiB

पदासन

व्याख्या:

"पदासन" या शब्दाचा संदर्भ एखाद्या वास्तूशी आहे, ज्याच्यावर एखादा मनुष्य त्याचे पाय ठेवतो, सहसा जेंव्हा तो बसून असतो तेंव्हा आधारासाठी. या शब्दाचा समर्पण आणि खालची स्थिती असा लाक्षणिक अर्थाचा उपयोग सुद्धा आहे.

  • पवित्र शास्त्राच्या काळातील लोक पाय हे शरीराच्या भागातील सर्वात कमी सन्मानाचा अवयव असे समजत होते. * म्हणून "पदासन" हे त्याच्यापेक्षाही खालचा सन्मान होता, कारण पाय त्याच्यावर ठेवले जात होते.
  • जेंव्हा देव म्हणतो, "मी माझ्या शत्रूंना माझ्या पायाचे पदासन करीन" तेंव्हा तो ज्या लोकांनी त्याच्या विरुद्ध बंड केला, त्यांच्यावर सामर्थ्याची, नियंत्रणाची, आणि विजयाची घोषणा करतो. ते नम्र होतील आणि देवाच्या इच्छेच्या अधीन राहण्याच्या मुद्द्यावर विजयी होतील.
  • "देवाच्या पदासनी त्याची उपासना करणे" ह्याचा अर्थ जसा तो त्याच्या सिंहासनावर बसेल तसे त्याच्यासमोर त्याची उपासना करण्यासाठी खाली वाकणे असा होतो. * हे पुन्हा देवाच्याप्रती नम्रपणा आणि समर्पण ह्याला दर्शिवते.
  • दावीद मंदिरला देवाचे "पदासन" असे संदर्भित करतो. ह्याचा संदर्भ लोकांच्यावर त्याच्या परिपूर्ण अधिकाराशी असू शकते. हे देव त्याच्या सिहासनावर राजा म्हणून असल्याचे आणि त्याचे पाय त्याच्या पदासानावर ठेवले आहेत ह्याचे चित्रण असू शकते, जे त्याला समर्पित असल्याचे दर्शविते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: