mr_tw/bible/other/fast.md

3.9 KiB
Raw Permalink Blame History

उपवास, उपास केला, उपास करीत

व्याख्या:

"उपवास" या शब्दाचा अर्थ काही काळासाठी अन्न खाण्याचे टाळणे, जसे की, एका दिवसासाठी किंवा अधिक दिवसासाठी. काहीवेळा त्याच्यामध्ये काही न पिण्याचा देखील समावेश होतो.

  • उपवास लोकांना देवावर केंद्रित करण्यास आणि जेवण बनवणे आणि खाणे ह्याने विचलित न होता प्रार्थना करण्यास मदत करतो.
  • येशूने यहुदी धार्मिक नेते चुकीच्या कारणासाठी उपवास करतात म्हणून त्यांची निंदा केली. इतरांनी ते धार्मिक आहे असे समजावे म्हणून ते उपवास करत.
  • काहीवेळा लोक, कशाबद्दल तरी खूप कष्टी किंवा दुःखी असतात, म्हणून ते उपवास करतात.
  • "उपवास" या क्रियापदाचे भाषांतर "खाण्यापासून परावृत्त होणे" किंवा "काहीही न खाणे" असे देखील केले जाऊ शकते.
  • "उपवास" या नामाचे भाषांतर "न खाण्याची वेळ" किंवा "अन्न सेवन करण्यापासून दूर राहण्याचा काळ" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: यहुदी पुढारी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 25:01 बाप्तिस्म्यानंतर लगेच पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात नेले, त्या ठिकाणी येशू चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास करतो.

  • 34:08 ‘‘उदाहरणार्थ, मी आठवड्यातून दोनदा उपास करितो आणि आपल्या सर्व उत्पन्नाचा दशांश तुला देतो.

  • 46:10 एके दिवशी, अंत्युखियाचे ख्रिस्ती उपवास-प्रार्थना करत असतांना, पवित्र आत्मा त्यांच्यावर आला व म्हणाला, "बर्णबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे, त्यासाठी त्यांना वेगळे करुन ठेवा."

  • Strong's: H2908, H5144, H6684, H6685, G777, G3521, G3522, G3523