mr_tw/bible/other/famine.md

2.6 KiB

दुष्काळ

व्याख्या:

"दुष्काळ" या शब्दाचा संदर्भ संपूर्ण देशामध्ये किंवा प्रांतामध्ये अन्नाच्या अतिशय कमतरतेशी येतो, सहसा हे पुरेसा पाऊस न झाल्यामुळे होते.

  • नैसर्गिक कारणांमुळे अन्न पिके अपयशी होऊ शकतात जसे पावसाचा अभाव, पीक रोग किंवा कीटकांचा प्रादुर्भाव.
  • अन्नाच्या कमतरतेला लोक सुद्धा कारणीभूत होऊ शकतात, जसे की, शत्रू जे पिकांचा नाश करतात.
  • पवित्र शास्त्रामध्ये, जेंव्हा राष्ट्रे देवाविरुद्ध पाप करतात, तेंव्हा त्याची शिक्षा म्हणून देव बऱ्याचदा त्यांच्यावर दुष्काळ पाठवतो.
  • अमोस 8:11 मध्ये "दुष्काळ" या शब्दाला लाक्षणिक अर्थाने वापरले आहे, आणि त्याचा संदर्भ अशा काळाशी येतो, जेंव्हा देव लोकांना त्यांच्याशी न बोलण्याने शिक्षा देईल. ह्याचे भाषांतर तुमच्या भाषेतील "दुष्काळ" या शब्दासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाने, किंवा "अतिशय कमतरता" किंवा "गंभीर अभाव" अशा अर्थाच्या वाक्यांशांनी केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: