mr_tw/bible/other/delight.md

3.9 KiB

आनंद, संतुष्ट, प्रसन्न, चांगली गोष्ट (आनंददायक)

व्याख्या:

एक "आनंद" हे असे काहीतरी आहे जे एखाद्याला अतिशय संतुष्ट करते किंवा खूप आनंदास कारणीभूत होते.

  • कशाच्यातरी "मध्ये आनंदी" असणे ह्याचा अर्थ "मध्ये आनंद घेणे" किंवा "च्या बद्दल आनंदी असणे" असा होतो.
  • जेंव्हा एखादी गोष्ट अतिशय आनंद देणारी किंवा प्रसन्न करणारी असते, तेंव्हा तिला आनंददायक म्हणतात.
  • जर एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये आनंदी होत असेल तर त्याचा अर्थ त्याला ती गोष्ट अतिशय आवडते असा होतो.
  • "माझा आनंद थोवाच्या नियमात आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर, "यहोवाचे नियम मला अतिशय आनंद देतात" किंवा "मला यहोवाच्या नियमशास्त्राचे पालन करायला आवडते" किंवा "जेंव्हा मी यहोवाच्या आज्ञा पाळतो, तेंव्हा मी आनंदी असतो" असे केले जाऊ शकते.
  • "यात आनंद घेऊ नका" आणि "यात आनंदी असू नका" या वाक्यांशाचे भाषांतर "च्या मुळे अजिबात आनंदी नाही" किंवा "च्या बद्दल आनंद नाही" असे केले जाऊ शकते.
  • यात तो स्वतः आनंदी असतो" या वाक्यांशाचा अर्थ एखादी गोष्ट "करण्यात त्याला आनंद वाटतो" किंवा तो एखाद्याबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल "खूप आनंदी आहे" असा होतो.
  • "संतुष्ट" या शब्दाचा संदर्भ अशा गोष्टींशी आहे, ज्यात त्या मनुष्याला आनंद मिळतो. याचे भाषांतर "आनंद" किंवा "गोष्टी ज्या आनंद देतात" म्हणून केले जाऊ शकते.
  • "मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात आनंद आहे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "तुझ्या इच्छेप्रमाणे करताना मला आनंद होतो" किंवा "जेंव्हा मी तुझी आज्ञा पाळतो, तेंव्हा मी खूप आनंदी होतो" असे देखील केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: