mr_tw/bible/other/defile.md

4.0 KiB

विटाळणे, भ्रष्ट करणे, भ्रष्ट केले, अशुद्ध, अशुद्ध होणे, भ्रष्ट झाली, अशुद्ध झाला, अशुद्ध झाले

व्याख्या:

"विटाळणे" आणि "अशुद्ध होणे" या शब्दांचा संदर्भ प्रदूषित किंवा गलिच्छ बनणे ह्याचाशी येतो. शारीरिक, नैतिक किंवा विधीसंबंधी अर्थाने काहीतरी अशुद्ध केले जाऊ शकते.

  • देवाने इस्राएल लोकांना ताकीद दिली की, ज्या गोष्टींना देवाने "अशुद्ध" किंवा "अपवित्र" म्हणून घोषित केले आहे, त्यांना खाऊन किंवा स्पर्श करून इस्राएल लोकांनी स्वतःला भ्रष्ट करू नये.
  • विशिष्ठ गोष्टी जसे की, मृत शरीरे आणि सांसर्गिक रोग ह्यांना देवाने अशुद्ध म्हणून घोषित केले होते, आणि जर एखादा व्यक्ती त्यांना स्पर्श करेल, तर तो भ्रष्ट होईल.
  • तुम्ही लैंगिक पाप नये अशी इस्राएलांना परमेश्वराने आज्ञा दिली. ते त्यांना भ्रष्ट करेल आणि ते देवाला अस्वीकृत असे होतील.
  • अशा काही शरीराच्या प्रक्रिया होत्या, ज्यामुळे एखादी व्यक्ती जोपर्यंत ती पुन्हा विधीनुसार शुद्ध बनत नसे तोपर्यंत, तात्पुरती अशुद्ध होत होती.
  • नवीन करारामध्ये, येशूने शिकवले की, पापमय विचार आणि कृत्ये ही खऱ्या अर्थाने मनुष्याला अशुद्ध करतात.

भाषांतर सूचना

  • "विटाळणे" या शब्दाचे भाषांतर "अशुद्ध होण्यास कारणीभूत" किंवा "अनैतिक होण्यास कारणीभूत" किंवा "विधीनुसार अस्वीकृत होण्यास कारणीभूत" असे केले जाऊ शकते.
  • "अशुद्ध असणे" ह्याचे भाषांतर "अशुद्ध बनणे" किंवा "(देवाला) नैतिकदृष्ट्या अस्वीकृत होण्यास कारणीभूत" किंवा "विधीनुसार अस्वीकृत बनणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: शुद्ध, स्वच्छ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: