mr_tw/bible/other/comfort.md

5.3 KiB

सांत्वन करणे, सांत्वन केले, सांत्वनपर, सांत्वन करणारा (कैवारी), सांत्वनकर्ते, अस्वस्थ

व्याख्या:

"सांत्वन करणे" आणि "सांत्वनकर्ते" या शब्दाचा अर्थ शारीरिक किंवा भावनिक वेदना सहन करणाऱ्या कोणास मदत करणे होय.

  • एखाद्याचे सांत्वन करणाऱ्या व्यक्तीला "सांत्वनकर्ता" से म्हणतात.
  • जुना करारामध्ये, "सांत्वन" या शब्दाचा उपयोग, देव कसा दयाळू आहे, आणि आपल्या लोकांबद्दल प्रेमळ आहे आणि जेंव्हा त्यांना दुःख होत असते तेंव्हा त्यांना मदत करतो ह्याचे वर्णन करण्यासाठी केला जातो.
  • नवीन करारामध्ये, असे म्हटले आहे की देव त्याच्या लोकांना पवित्र आत्म्याद्वारे सांत्वन देईल. जे सांत्वन पावले आहेत, ते नंतर जे इतर लोक दुःख सहन करीत असतात त्यांना तेच सांत्वन देण्यासाठी सक्षम होतात.
  • "इस्रायेलाचा सांत्वनकर्ता" या अभिव्यक्तीचा संदर्भ मसीहाशी आहे, जो त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी येईल.
  • येशूने पवित्र आत्म्याला "सांत्वनकर्ता" असे म्हटले आहे, जो येशूमध्ये विश्वास ठेवण्यास मदत करतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "सांत्वन करणे" ह्याचे भाषांतर "च्या वेदना सुसह्य करणे" किंवा "(एखाद्याला) दुःखावर मात करण्यासाठी मदत करणे" किंवा "उत्तेजन देणे" किंवा "सांत्वन (आधार) देणे असे केले जाऊ शकते.
  • "आमचे सांत्वन" या वाक्यांशाचे भाषांतर "आमचे उत्तेजन" किंवा "(एखाद्याला)आमचा सांत्वन (आधार)" किंवा "दुःखाच्या वेळी आमची मदत" म्हणून केले जाऊ शकते.
  • "सांत्वनकर्ता" या शब्दाचे भाषांतर "सांत्वन देणारा व्यक्ती" किंवा "दुःख हलके करण्यास मदत करणारा व्यक्ती" किंवा "उत्तेजन देणारा व्यक्ती" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा पवित्र आत्म्याला "सांत्वन देणारा" असे म्हंटले जाते, तेंव्हा ह्याचे भाषांतर "उत्तेजनकर्ता" किंवा "मदतनीस" किंवा "मदत आणि मार्गदर्शन करणारा" असे केले जाऊ शकते.
  • "इस्राएलाचा सांत्वनकर्ता" या वाक्यांशाचे भाषांतर, "मसीहा, जो इस्राएलाचे सांत्वन करतो" असे केले जाऊ शकतो.
  • "त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही" या अभिव्यक्तीचे भाषांतर, "कोणीही त्यांचे सांत्वन केले नाही" किंवा "त्यांना मदत करण्यास किंवा उत्तेजन करण्यास कोणीही नव्हते" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहाः उत्तेजन, पवित्र आत्मा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: