mr_tw/bible/other/census.md

3.3 KiB

नावनिशी (शिरगणना)

व्याख्या:

"शिरगणना" या शब्दाचा अर्थ त्या राष्ट्रामध्ये किंवा साम्राज्यामध्ये असलेल्या लोकांची औपचारिक मोजदाद करणे असा होतो.

  • जुन्या करार वेगवेगळ्या वेळेच्या नोंदी करते, जेंव्हा देवाने इस्राएलाच्या मनुष्यांना मोजण्याची आज्ञा दिली, जसे की, जेंव्हा इस्राएल लोक मिसरमधून निघाले तेंव्हा आणि परत जेंव्हा ते लोक कनानमध्ये प्रवेश करणारा होते तेंव्हा.
  • बऱ्याचदा शिरगणना करण्यामागचा हेतू हा असायचा की, किती लोक कर भरत आहेत.
  • उदाहरणार्थ, एक वेळा निर्गममध्ये इस्राएलाच्या मनुष्यांची मोजदाद केली गेली, जेणेकरून, प्रत्येकाने मंदिराच्या काळजीसाठी अर्धे शेकेल भरावयाचे होते.
  • जेंव्हा येशू लहान बाळ होता, तेंव्हा रोमी सरकारने त्यांच्या साम्राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांची मोजदाद अश्यासाठी केली की, त्यांनी कर भरावा म्हणून त्यांची नावनिशी केली होती.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर करण्याच्या शक्य पद्धतींमध्ये, "लोकांच्या नावाची मोजदाद करणे" किंवा "नावांची यादी" किंवा "नावनोंदणी" असे केले जाऊ शकते.
  • "नावनिशी घ्या" या वाक्यांशाचे भाषांतर, "लोकांच्या नावांची नोंद करा" किंवा "लोकांची नावनोंदणी करा" किंवा "लोकांची नावे लिहून काढा" असे केले जाऊ शकते.

(हेसुद्धा पहा: राष्ट्र, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: