mr_tw/bible/other/bowweapon.md

2.4 KiB

धनुष्य आणि बाण

व्याख्या:

या प्रकारच्या शस्त्रामध्ये तारांच्या धनुष्याच्या सहाय्याने बाणांना फेकण्याचा समावेश होतो. पवित्र शास्त्राच्या काळात, ह्याचा उपयोग शत्रूंशी लढण्यासाठी आणि प्राण्यांना अन्नासाठी मारण्यासाठी केला जात होता.

  • धनुष्याला लाकूड, हाड, धातू किंवा इतर कठीण साहित्य, जसे की, हरणाचे शिंग ह्यापासून बनवले जात होते. ते वक्र आकाराचे असते आणि तारा, दोरी, किंवा वेलीने कसून बांधलेले असते.
  • बाण हा पातळ दांड्याचा तीक्ष्ण, आणि एका टोकाला टोकदार असतो. प्राचीन काळात, बाणांना वेगवेगळ्या साहित्यांचा उपयोग करून बनवले जात होते, जसे की, लाकूड, हाड, दगड किंवा धातू.
  • धनुष्य आणि बाणांना समान्यपणे शिकारी आणि योद्ध्यांच्या द्वारे वापरण्यात येत होते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, "बाण" या शब्दाचा उपयोग काहीवेळा लाक्षणिक अर्थाने शत्रूंच्या हल्ल्यासाठी किंवा दैवी न्यायासाठी संदर्भित केला जातो.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: