mr_tw/bible/other/bow.md

4.6 KiB

नमन करणे (पाया पडणे), वाकणे, नमन केले, दंडवत घालणे, नमोत, खाली वाकणे, खाली वाकला, उपासना करणे

व्याख्या:

नमन करणे ह्याचा अर्थ एखाद्याप्रती आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी त्याच्यासमोर नम्रपणे वाकणे असा होतो. "खाली वाकणे (नमणे)" ह्याचा अर्थ खाली वाकले किंवा गुडघ्यावर खूप खाली येणे, सहसा तोंड आणि हट हे जमिनींच्या देईशेने करून असा होतो.

  • इतर अभिव्यक्तींमध्ये "गुडघ्यात वाकणे" (ह्याचा अर्थ गुडघ्यावर येणे) आणि "डोके वाकवणे" (ह्याचा अर्थ नम्र आदराने किंवा दुःखात डोके पुढच्या दिशेला वाकवणे) ह्यांचा समावेश होतो.
  • खाली वाकणे हे त्रासाचे किंवा शोकाचे सुद्धा एक चिन्ह असू शकते. जो "खाली वाकलेला" आहे, त्याला नम्रतेच्या खालच्या स्थितीला आणण्यात आले आहे.
  • बऱ्याचदा एखादी व्यक्ती त्याच्यापेक्षा उच्च दर्जाच्या किंवा जास्त महत्वाच्या जसे की राजे आणि इतर शासक ह्यांच्या उपस्थितीत वाकली जाते.
  • देवाच्या समोर खाली वाकणे , म्हणजे त्याची उपासना करण्याची अभिव्यक्ती आहे.
  • पवित्र शास्त्रामध्ये जेंव्हा लोकांना येशूने केलेल्या चमत्कारावरून आणि शिक्षणावरून खात्री झाली की, तो देवाकडून आला आहे, तेंव्हा त्यांनी त्याला नमन केले.
  • पवित्र शास्त्र असे सांगते की, जेंव्हा येशू एखाद्या दिवशी परत येईल, तेंव्हा सर्व लोक त्याची उपासना करण्यासाठी गुडघे टेकतील.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर अशा शब्दाने किंवा वाक्यांशाने करायला हवे ज्याचा अर्थ "पुढे वाकणे" किंवा "डोके वाकवणे" किंवा "गुडघे टेकणे."
  • "खाली वाकणे" या शब्दाचे भाषांतर "गुडघे टेकणे" किंवा "साष्टांग नमस्कार घालणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, काही भाषेमध्ये या शब्दाचे भाषांतर करण्याचे एकापेक्षा अधीक मार्ग असू शकतात.

(हे सुद्धा पाहा: नम्र, उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: