mr_tw/bible/other/blemish.md

2.2 KiB

दोष, कलंक, निर्दोष

तथ्य:

"दोष" या शब्दाचा संदर्भ, एखाद्या व्यक्ती किंवा प्राण्याच्या शारीरिक उणीवाशी किंवा अपरिपूर्णतेशी आहे. ह्याचा संदर्भ लोकांतील आत्मिक अपरिपूर्णता आणि चुकांशी देखील येतो.

  • काही विशिष्ठ बलिदानांसाठी, देवाने इस्राएल लोकांना अर्पण करावयाचा प्राणी कोणताही कलंक किंवा उणीव नसलेला घेण्याची सूचना केली.
  • येशू ख्रिस्त हा कसा कोणतेही पाप नसलेला एक परिपूर्ण बलिदान होता, याचे हे चित्र आहे.
  • ख्रिस्तामध्ये विश्वासणारे त्याच्या रक्ताने आपल्या पापांपासून शुद्ध होतात, आणि दोषहीन मानले जातात.
  • संदर्भावर आधारित, या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "उणीव" किंवा "अपरिपुर्णता" किंवा "पाप" यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: विश्वास, शुद्ध, बलिदान, पाप)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: