mr_tw/bible/other/biblicaltimehour.md

3.3 KiB

प्रहर, घटकेस (प्रहरी)

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "प्रहर" या शब्दाचा उपयोग सहसा एखादी घटना दिवसाच्या कोणत्या वेळी घडली हे सांगण्यासाठी केला जातो. * ह्याचा उपयोग लाक्षणिक रूपाने "वेळ" किंवा "क्षण" ह्याच्या अर्थासाठी सुद्धा केला जातो.

  • यहुदी सुर्योदयापासून सुरु होणारा दिवसाचा तास मोजत होते, (सकाळी 6 च्या सुमारास). उदाहरणार्थ, "नववा तास" ह्याचा अर्थ "दुपारी तीन च्या सुमारास" असा होतो.
  • रात्रीचे तास मोजण्याची सुरवात सूर्यास्तापासून होते (संध्याकाळी 6 च्या सुमारास). * उदाहरणार्थ, "रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी" ह्याचा अर्थ आता आपल्या सध्याच्या युगाच्या प्रणालीनुसार "संध्याकाळी नऊच्या सुमारास" असा होतो.
  • पवित्र शास्त्रामधील वेळेचे संदर्भ सध्याच्या काळाच्या व्यवस्थेशी जुळत नाहीत म्हणून, "नऊच्या सुमारास" किंवा "सहा वाजण्याच्या सुमारास" अशा वाक्यांशाचा उपयोग केला जाऊ शकतो.
  • काही भाषांतरे कदाचित "संध्याकाळी" किंवा "सकाळी" किंवा "दुपारी" अशा वाक्यांशाना दिवसाच्या कोणत्या वेळेसंदर्भात बोलले जात आहे, हे स्पष्ट करण्यासाठी जोडू शकतात.
  • "त्या घटकेस" या वाक्यांशाचे भाषांतर "त्या वेळी" किंवा "त्या क्षणी" असे केले जाऊ शकते.
  • येशूच्या संदर्भात, "त्याची घटका आली" या अभिव्यक्तीचे भाषांतर "त्याची वेळ आली होती" किंवा "त्याच्यासाठी नियुक्त केलेली वेळ आली होती" असे केले जाऊ शकते.

पवित्र शास्त्रातील संदर्भ: