mr_tw/bible/names/zechariahnt.md

2.9 KiB
Raw Permalink Blame History

जख-या (नवा करार)

तथ्य:

नवीन करारामध्ये, जख-या हा यहुदी याजक होता, जो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा बाप बनला.

  • जख-याने देवावर प्रेम केले आणि त्याची आज्ञा पाळली.
  • अनेक वर्षापर्यंत, जख-या आणि त्याची पत्नी, अलिशिबा, ह्यांनी मुलासाठी कळकळीची प्रार्थना केली, पण त्यांना एकही मुलबाळ झाले नाही. नंतर जेंव्हा ते अतिशय म्हातारे झाले, तेंव्हा देवाने त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि त्यांना एक मुलगा दिला.
  • जख-याने भविष्य =वाणी केली की, त्याचा मुलगा योहान हा एक संदेष्टा होईल, जो येणाऱ्या मसिहा विषयी घोषणा करेल आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करेल.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: ख्रिस्त, अलिशिबा, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • अचानक एके दिवशी जख-या नावाच्या एका वयोवृध्द याजकाकडे एक देवदूत एक संदेश घेऊन आला. जख-या व त्याची पत्नी, अलीशिबा, हे धार्मिक लोक होते, पण त्यांना मुलबाळ नव्हते.

  • देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुझ्या पत्नीस मुलगा होणार आहे. त्याचे नाव तूम्ही योहान असे ठेवा.

  • लगेच जखर्या मुका झाला.

  • तेंव्हा देवाने जखर्यास पुन्हा बोलण्याची अनुमति दिली.

  • Strong's: G2197