mr_tw/bible/names/succoth.md

1.9 KiB

सुक्कोथ

व्याख्या:

जुन्या करारांमध्ये सुक्कोथ हे दोन शहरांचे नाव होते. "सुक्कोथ" या शब्दाचा अर्थ "निवारा" असा होतो.

  • पहिले सुक्कोथ नावाचे शहर, यार्देन नदीच्या पश्चिमेस वसलेले होते.
  • याकोब त्याच्या कुटुंब आणि गुरेढोरांसमवेत सुक्कोथ येथे निवारा बांधून राहिला.
  • शेकडो वर्षानंतर, गीदोन आणि त्याचे थकलेले लोक सुक्कोथ येथे थांबले, कारण ते मिद्यानी लोकांचा पाठलाग करत होते, परंतु तिथल्या लोकांनी त्यांना तेथे अन्न देण्यास नकार दिला.
  • दुसरे सुक्कोथ हे मिसरच्या उत्तरी सीमेवर स्थित होते, आणि हे ते ठिकाण आहे, जेथे इस्राएल लोक लाल समुद्रातून पलीकडे गेल्यानंतर थांबले होते, कारण ते मिसरच्या गुलागिरीतून पळून चालले होते.

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: