mr_tw/bible/names/peter.md

5.8 KiB
Raw Permalink Blame History

पेत्र, शिमोन पेत्र, केफा

तथ्य:

पेत्र हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता. तो एक आद्य मंडळीचा महत्वाचा नेता होता.

  • येशूने त्याला त्याचा शिष्य म्हणून बोलावण्याच्या पूर्वी, पेत्राचे नाव शिमोन होते.
  • नंतर, येशूने सुद्धा त्याचे नाव "केफा" असे ठेवले, ज्याचा अर्थ अरामी भाषेत "दगड" किंवा "खडक" असा होतो. पेत्र या नावाचा सुद्धा अर्थ ग्रीक भाषेत "दगड" किंवा "खडक" असा होतो.
  • देवाने लोकांना बरे करण्यासाठी आणि येशूबद्दलची सुवार्ता सांगण्यासाठी पेत्रामार्फत कार्य केले.
  • नवीन करारातील दोन पुस्तके, ही पेत्राने सह विश्वासुंना उत्साहित करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी लिहिलेली पत्रे आहेत.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शिष्य, प्रेषित)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 28:09 पेत्र त्याला म्हणू लागला, "पाहा, आम्ही सर्व सोडले आणि आपल्या मागे आलो आहोत." याचे आम्हास काय प्रतिफळ मिळणार?

  • 29:01 एके दिवशी,पेत्राने येशूला विचारले,‘‘प्रभुजी, जेंव्हा माझा भाऊ माझ्याविरुद्ध अपराध करील तेव्हा मी त्यास किती वेळा क्षमा करावी? सात वेळा काय?

  • 31:05 तेंव्हा पेत्र येशूला म्हणला, ‘‘प्रभुजी, जर आपण आहात, तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा द्या. येशूने पेत्रास म्हटले, ‘‘ये!

  • 36:01 एके दिवशी, येशूने आपल्या शिष्यांपैकी पेत्र, याकोब व योहान हया तिघांना आपल्या बरोबर घेतले.

  • 38:09 पेत्राने उत्तर दिले, ‘‘जरी सर्वांनी तुला सोडिले, तरी मी तुला सोडणार नाही! * तेंव्हा येशू पेत्रास म्हणाला, ‘‘सैतानाने तुम्हा सर्वांचा नाश करायचे ठरविले आहे, परंतू मी तुम्हासाठी प्रार्थना केली आहे, पेत्रा, अशासाठी की तुमचा विश्वास डळमळू नये. तरीदेखिल आज रात्री, कोबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.

  • 38:15 सैनिक येशूला पकडत असतांना, पेत्राने आपली तलवार काढली व महायाजकाच्या सेवकाचा कान कापला.

  • 43:11 पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील.

  • 44:08 पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरा होऊन तुम्हापुढे उभा आहे.

  • Strong's: G2786, G4074, G4613