3.8 KiB
3.8 KiB
नासरेथ, नासोरी
तथ्य:
उत्तरी इस्राएल मधील गालील प्रांतातील नासरेथ हे एक गाव होते. हे यरुशलेमेपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर होते, आणि पायी तेथे पोहोचण्यासाठी सुमारे तीन ते पाच दिवस लागत.
- योसेफ आणि मरिया हे नासरेथ गावाचे होते, आणि हेच ते ठिकाण आहे जिथे त्यांनी येशूला वाढीवले. म्हणून तर येशूला "नासोरी" म्हणून ओळखले जाते.
- नासरेथमध्ये राहणाऱ्या अनेक यहुद्यांनी येशूच्या शिक्षणाचा आदर केला नाही, कारण तो त्यांच्यामध्ये वाढला होता, आणि तो एक साधारण मनुष्य आहे असा ते विचार करीत.
- एकदा, जेंव्हा येशू नासरेथमधील मंदिरात शिकवत होता, तेंव्हा तिथल्या यहुद्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, कारण तोच मसिहा आहे असा त्याने दावा केला आणि त्याला नाकारल्याबद्दल त्याने त्यांना दोष लावला.
- जेंव्हा नाथानएलने ऐकले की येशू नासरेथ या गावचा आहे, तेंव्हा त्याने जी टिप्पणी केली त्यावरून असे सूचित होते की, ते शहर अतिशय उच्च असे नव्हते.
(हे सुद्धा पहा: ख्रिस्त, गालील, योसेफ, मरिया)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- प्रेषितांची कृत्ये 26:9-11
- योहान 01:43-45
- लुक 01:26-29
- मार्क 16:5-7
- मत्तय 02:22-23
- मत्तय 21:9-11
- मत्तय 26:71-72
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
23:04 योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दावीद हा बेथलेहेम गावाचा होता.
-
26:02 येशू त्याच्या बालपणी राहात असलेल्या नासरेथ या ठिकाणी गेला.
-
26:07 नासरेथातील लोकांनी येशूला पकडून ओढत डोंगराच्या कडयावरुन फेकून त्यास जीवे मारावे म्हणून नेले.
-
Strong's: G3478, G3479, G3480