mr_tw/bible/names/moab.md

2.1 KiB

मवाब, मवाबी, मवाबांच्या

तथ्य:

‌‌‌मवाब हा लोटच्या मोठ्या मुलीचा मुलगा होता. हे जमिनीचे नाव देखील पडले, जिथे तो आणि त्याचे कुटुंब राहत होते. "मवाबी" या शब्दाचा संदर्भ, अशा मनुष्याशी येतो, जो मवाबाचा वंशज आहे, किंवा जो मवाब देशामध्ये राहतो.

  • मवाब देश मृत समुद्राच्या पूर्वेस स्थित होता.
  • मवाब हे बेथलेहेम गावापासून दक्षिणपूर्व दिशेस होते, जिथे नओमीचे कुटुंब राहत होते.
  • बेथलेहेममधील लोकांनी रुथला "मवाबी" असे म्हंटले, कारण ती मवाब देशात राहणारी स्त्री होती. * या शब्दाचे भाषांतर "मवाबी स्त्री" किंवा "मवाब देशातील स्त्री" असे देखील केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बेथलेहेम, यहुदिया, लोट, रुथ, मृत समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: