mr_tw/bible/names/lystra.md

2.4 KiB

लुस्त्र

तथ्य:

लुस्त्र हे प्राचीन आशिया मायनरमधील एक शहर होते, ज्याला पौलाने आपल्या सुवार्ता प्रसाराच्या प्रवासाच्या वेळी भेट दिली होती. ते लुकवनियाच्या प्रांतात स्थित होते, जे आताचा तुर्की देश आहे त्यामध्ये आहे.

  • जेंव्हा इकुन्यातील यहुद्यांनी पौलाला आणि त्याच्या सोबत्यांना धमकी दिली, तेंव्हा ते दर्बे आणि लुस्त्र येथे पळून गेले.
  • लुस्त्रमध्ये, पौल तीमिथ्याला भेटला, त्याच्या साथीचा सुवार्ता प्रसारक आणि मंडळींची स्थापना करणारा बनला.
  • पौलाने लुस्त्र येथे एका अपंग मनुष्याला बरे केल्यानंतर, तेथील लोकांनी पौल व बर्णबाला देव म्हणून त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रेषितांनी त्यांना दटावले आणि असे करण्यापासून त्यांना रोखले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: सुवार्ता प्रसारक, इकुन्या, तीमोथ्यी)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: