6.3 KiB
यहोशवा
तथ्य:
पवित्र शास्त्रामध्ये यहोशवा नावाचे अनेक वेगवेगळे पुरुष होते. सर्वज्ञात असलेला यहोशवा हा नुनाचा मुलगा, जो मोशेचा मदतनीस होता, आणि जो नंतर देवाच्या लोकांचा महत्वाचा नेता बनला.
- वचनदत्त भूमीची हेरगिरी करण्यास मोशेने पाठवलेल्या बारा जणांपैकी यहोशवा एक होता.
- कालेबबरोबरच, यहोशवाने इस्राएली लोकांना वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याबद्दल आणि कनानी लोकांवर विजय मिळवण्यासाठी देवाच्या आज्ञेचे पालन करण्याचे आवाहन केले.
- मोशे मेल्यानंतर, बऱ्याच वर्षांनी, देवाने इस्राएल लोकांचे नेतृत्व वचनदत्त भूमीत करण्यासाठी यहोशवाला नियुक्त केले.
- कनानी लोकांविरुद्धच्या सर्वात प्रथम आणि सर्वात प्रसिद्ध लढाईत, यहोशवाने इस्राएलांचे यरीहो शहराला पराभूत करण्यासाठी नेतृत्व केले.
- जुन्या करारातील यहोशवा नावाच्या पुस्तकात, यहोशवाने वचनदत्त भूमीचा कब्जा घेण्यासाठी कसे इस्राएल लोकांचे नेतृत्व केले, आणि इस्राएलातल्या प्रत्येक गोत्राला, त्या भूमीत राहण्यासाठी कसा त्याने प्रांत नेमून दिला याविषयी सांगितले आहे.
- योसादाकाचा मुलगा यहोशवा ह्याचा उल्लेख हग्गय आणि जखऱ्या या पुस्तकात आला आहे; तो एक महायाजक होता, ज्याने यरुशलेमेची पडलेली भिंत पुन्हा बांधण्यास मदत केली.
- यहोशवा नावाच्या इतर अनेक पुरुषांचा उल्लेख वंशावळीत आणि पवित्र शास्त्रामधील इतर ठिकाणी नमूद केलेला आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: कनान, हग्गय, यरीहो, मोशे, वचनदत्त भूमी, जखऱ्या
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
14:04 जेव्हा इस्राएल लोक कनान देशाच्या सीमेवर आले, तेव्हा मोशेने इस्राएलाच्या बारा वंशामधून प्रत्येकी एक अशा बारा मनुष्यांस निवडले. त्याने त्या मनुष्यांस कसे जावे व देश कसा हेरावा याविषयी सुचना देऊन तो देश कसा आहे हे बघायला सांगितले.
-
14:06 लगेच कालेब आणि __यहोशवा __ हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो.
-
14:08 लगेच कालेब आणि यहोशवा हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो.
-
14:14 मोशे आता वयोवृद्ध झाला असल्यामूळे परमेश्वराने लोकांचे नेतृत्व करण्यास त्याची मदत करण्यासाठी यहोशवाची निवड केली.
-
14:15 यहोशवा एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विश्वास ठेविला व त्याच्या आज्ञा पाळल्या.
-
15:03 यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशवास सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा.
-
Strong's: H3091, G2424