mr_tw/bible/names/herodthegreat.md

3.2 KiB

महान हेरोद

तथ्य:

जेंव्हा येशूचा जन्म झाला त्यावेळी महान हेरोद हा यहुदावर राज्य करत होता. तो अनेक अदोमी राज्यांच्यापैकी पहिला होता, ज्याचे नाव हेरोद होते, ज्याने रोमी सम्राटाच्या भागांवर राज्य केले.

  • त्यांच्या पूर्वजांनी यहुदी धर्म स्वीकारला आणि त्याला यहुद्यांसारखे वाढवले.
  • कैसर औगुस्त ह्याने त्याचे नाव "हेरोद राजा" ठेवले, जरी तो खरा राजा नव्हता तरीही. त्याने यहुदातील यहुद्यांवर 33 वर्षापर्यंत राज्य केले.
  • महान हेरोद हा त्याने बांधण्यास सांगितलेल्या सुंदर इमारतींसाठी आणि यरुशलेममधील यहुदी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी दिलेल्या हुकुमासाठी प्रसिद्ध आहे.
  • हेरोद हा अतिशय क्रूर राजा होता आणि त्याने पुष्कळ लोकांना मारले. जेंव्हा त्याने ऐकले की, "यहूद्यांच्या राजाचा" बेथेलहेमात जन्म झाला आहे, तेंव्हा त्याने त्या गावातील सर्व मुलांना मारून टाकले.

त्याचा मुलगा हेरोद अंतिपा आणि हेरोद फिल्लीप्प आणि त्याचा नातू हेरोद अग्रीप्पा हे रोमी शासक बनले. त्याचा पणतू हेरोद अग्रीप्पा II ("अग्रीप्पा राजा" असे म्हंटले), ह्याने यहुदाच्या संपूर्ण प्रांतावर राज्य केले.

(पहा: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हेरोद अंतिपा, यहूदा, राजा, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: