3.1 KiB
3.1 KiB
गीबोन, गीबोनी, गीबोनांच्या
तथ्य:
गीबोन हे एक शहर होते, जे यरुशलेमेच्या उत्तर पश्चिमेस 13 किलोमीटर अंतरावर स्थित होते. गीबोनमध्ये राहणाऱ्या लोकांना गीबोनी असे म्हंटले जात होते.
- जेंव्हा गीबोनाच्या लोकांनी ऐकले की, कसे इस्राएली लोकांनी यरीहो आणि आय शहरांचा नाश केला, तेंव्हा ते घाबरले.
- म्हणून गीबोनी लोक इस्राएलाच्या पुढाऱ्यांजवळ गील्गाल येथे आले, आणि त्यांनी असे सोंग केले की, ते दूर देशाचे लोक आहेत.
- इस्राएली पुढारी फसले गेले आणि त्यांनी गीबोनाच्या लोकांच्याबरोबर करार केला की, ते त्यांना संरक्षण देतील आणि त्यांचा नाश करणार नाहीत.
(हे सुद्धा पहा: गील्गाल, यरीहो, यरुशलेम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
15:06 परंतु गिबोनी नावाचा कनानमधील एक लोकगट यहोशवाबरोबर खोटे बोलला ते म्हणाले की ते कनानापासून खूप लांब रहतात.
-
15:07 काही काळानंतर, कनानमधील इतर लोकगटाच्या राजांनी, अमोरी लोकांनी, ऐकले की गिबोनी लोकांनी इस्राएलाबरोबर करार केला आहे, तेव्हा त्यांनी आपले सैन्य एकत्र करून गिबोन्यांवर हल्ला केला.
-
15:08 यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या सैनिकांस जमा केले व गिबोन्यांकडे पोहोचण्यासाठी रात्रभर चालत राहिले.
-
Strong's: H1391, H1393