mr_tw/bible/names/cain.md

2.4 KiB

काईन

तथ्य:

काईन आणि त्याचा लहान भाऊ हाबेल हे आदाम आणि हव्वा ह्यांचे पहिले मुलगे होते, ज्यांचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केला आहे.

  • काईन हा शेतकरी होता, ज्याने अन्न पिकांचे उत्पादन केले, तर हाबेल हा कळप राखणारा होता.
  • काईनाने त्याचा भाऊ हाबेल ह्याला मत्सराने मारून टाकले, कारण देवाने हाबेलचे अर्पण स्वीकार केले पण त्याने काईनचे अर्पण स्वीकार केले नाही.
  • ह्याची शिक्षा म्हणून, देवाने त्याला एदेन बागेपासून दूर पाठवून दिले आणि त्याला सांगितले की इथून पुढे जमीन त्याच्यासाठी पिके उत्पन्न करणार नाही.
  • देवाने काईनाच्या कपाळावर एक खून केली, ते ह्याचे चिन्ह होते की, तो भटकत असताना इतर लोकांच्याकडून मारले जाण्यापासून देव त्याला वाचवील.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः आदाम, अर्पण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: